Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभवने बोर्डाची परीक्षा का बुडवली? वडिलांनी अखेर सत्य समोर आणलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सूर्यवंशीने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या पेपरला दांडी मारली होती.त्यानंतर प्राध्यापकाने त्याला गैरहजरचा शेरा मारला होता. या सगळ्या घडामोडीवर आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगचेच दहावीच्या सीबीएससी बोर्डाची परीक्षेच्या तयारीला लागला होता.अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध माध्यमांमध्ये झळकल्या होत्या.
advertisement
2/7
विशेष म्हणजे, वैभवने बोर्डाच्या परीक्षेसाठी लागणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती.त्यामुळे त्याचे हॉलतिकीट आणि परीक्षा केंद्राचे नाव समोर आले होते.
advertisement
3/7
बिहारमधील पोदार इंटरनेशनल स्कुलमध्ये वैभव सूर्यवंशीचे परीक्षा केंद्र होते. पण पहिल्याच पेपरला वैभव सूर्यवंशीने दांडी मारली होती. त्यानंतर पोंदार शाळेच्या प्राध्यापकांनी त्याला गैरहजरचा शेरा दिला होता.
advertisement
4/7
परीक्षा केंद्रावर तो आलाच नाही.त्यामुळे आम्ही सीबीएससीच्या नियमानुसार त्याला गैरहजर मार्क केले आहे. वैभव सूर्यवंशीकडून आम्हाला या मागचं कुठलंही ठोस कारण सांगण्यात आलं नाही आहे.पण कदाचित त्याच्यावर क्रिकेट मॅच, प्रॅक्टीस किंवा आता आयपीएल देखील सूरू होणार आहे.त्यामुळे कदाचित तो त्यात व्यस्त असेल, असे पोदार इंटरनेशनल स्कुलचे प्राध्यापक एनके सिन्हा यांनी सांगितले आहे.
advertisement
5/7
दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर आता वैभव सूर्यवंशींच्या वडिलांनी यावर मौन सोडलं आहे.वैभव सू्र्यवंशीने जर बोर्डाची परीक्षा दिली तर त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करता येणार नाही आहे.आणि माझा मुलगा खूप हुशार आहे पण त्याचं संपूर्ण लक्ष आता क्रिकेटकडे आहे असे देखील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले.
advertisement
6/7
माझा मुलगा राजस्थान रॉयल्सच्या टीमच्या खेळाडूंसोबत नागपूरमध्ये प्रॅक्टीस करतो आहे. यदांच्या वर्षी त्याच्या परीक्षेबाबत प्रचंड चर्चा सूरू आहे.त्यामुळे त्याने बोर्डाची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी तो या परीक्षेची तयारी करेल,अशी माहिती वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव यांनी मिडडेला सांगितलं आहे.
advertisement
7/7
वैभव अभ्यासात हुशार आहे त्याला प्रत्येक विषयात 90 टक्के मिळतात, पण सध्या क्रिकेट गरजेच आहे,असे संजीव सूर्यवंशी सांगतात. त्यामुळे एकंदरीत त्याने आयपीएलसाठी आपली बोर्डाची परीक्षा सोडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभवने बोर्डाची परीक्षा का बुडवली? वडिलांनी अखेर सत्य समोर आणलं