T20 World Cup : सुपर 8 च्या चक्रव्युहात अडकणार सूर्या, हा संघ देणार 'टफ फाईट', फायनलची वाट बिकट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाला थेट सुपर 8 चे सामने खेळायचे आहे. टीम इंडियाच्या ग्रुप मध्ये साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाबे हे तीन संघ असणार आहेत.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया सूपर 8 मध्ये पोहोचली आहे.सूपर 8 सामन्याआधी टीम इंडियाने नेदरलँड 17 धावांनी पराभव केला होता. यासह भारताने ग्रुप स्टेजमधले चारही सामने जिंकले होते.
advertisement
2/7
दरम्यान आता टीम इंडियाला थेट सुपर 8 चे सामने खेळायचे आहे. टीम इंडियाच्या ग्रुप मध्ये साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाबे हे तीन संघ असणार आहेत. या तीन टीमपैकी कोणत्या संघाचे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे.हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
सूपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेविरूद्ध असणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारी 2026 ला खेळवला जाणार आहे.
advertisement
4/7
टी20 वर्ल्ड कपमध्ये सध्या साऊथ आफ्रिका चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ग्रुपमध्ये देखील साऊथ आफ्रिका टॉपला होती. अशापरिस्थितीत सूपर 8 मध्ये टीम इंडियासमोर साऊथ आफ्रिकेच तगडं आव्हान असणार आहे.पण हे आव्हान टीम इंडियाला पेलवून विजय मिळवणे गरजेचे असणार आहे.त्यामुळ सूपर 8च्या पहिल्या विजयाकडे सूर्याच्या टीमचे लक्ष असणार आहे.
advertisement
5/7
साऊथ आफ्रिकेनंतर टीम इंडियाची लढत ही वेस्ट इंडिज आणि झिम्बाबे विरूद्ध असणार आहे.या दोन्ही संघांवर टीम इंडिया सहज विजय मिळवू शकते. पण या संघांना हलक्यात घेण कॅप्टन सूर्याला महागात पडू शकतं.
advertisement
6/7
यामागचं कारण म्हणझे झिम्बाबे आणि वेस्टइंडिज उलटफेर करण्यात माहिर आहेत. झिम्बाबे ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर केले होते.तर वेस्ट इंडिज टीम कोणत्याही क्षणी फॉर्ममध्ये येऊ शकते. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि झिम्बाबेला हलक्यात घेण्याची चूक भारताने करू नये.
advertisement
7/7
यंदाचा टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात आहे.त्यामुळे आता टीम इंडिया ही गोष्ट खरी करून दाखवते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सुपर 8 च्या चक्रव्युहात अडकणार सूर्या, हा संघ देणार 'टफ फाईट', फायनलची वाट बिकट