TRENDING:

'माझ्या आतून कुणालातरी बाहेर काढलं', हॉरर फिल्मच्या शूटिंगनंतर शरीरात भूत घुसल्याचा अभिनेत्रीचा दावा

Last Updated:
Horror Movie : बॉलीवूडमधील सगळ्यात खतरनाक फिल्मपैकी एक असलेली ही फिल्म, ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली होती. पण या फिल्मच्या अभिनेत्रीसाठी तो भयानक अनुभव फक्त फिल्मपुरता मर्यादित राहिली नव्हता.
advertisement
1/7
'माझ्या आतून काढलं', हॉरर फिल्मच्या शूटनंतर शरीरात भूत घुसलं, अभिनेत्रीचा दावा
तुम्ही कितीतरी हॉरर फिल्म्स पाहिल्या असतील काही लोकांना हॉरर फिल्म पाहिल्यानंतर भीती वाटते, तर काहींना भास होतात. तुम्हाला वाचून धक्का बसेल अशाच एका हॉरर फिल्ममध्ये काम करणारी एक अभिनेत्री जिने या फिल्मच्या शूटिंगनंतर आपल्या शरीरात भूत घुसल्याचा दावा केला आहे.
advertisement
2/7
ही अभिनेत्री आहे वैष्णवी मॅकडोनाल्ड. जिने शक्तीमानमध्ये गीता विश्वासची भूमिका केली होती. वयाच्या नवव्या वर्षी तिने 1988 साली रामसे ब्रदर्सच्या वीराना फिल्ममधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या फिल्ममध्ये तिने बालककलाकार म्हणून काम केलं होतं. ही एक हॉरर फिल्म.
advertisement
3/7
सिद्धार्थ कन्ननसोबतच्या अलिकडच्या पॉडकास्टमध्ये तिने या फिल्मच्या शूटिंगनंतर तिला आलेल्या भयानक अनुभवाबाबत सांगितलं.
advertisement
4/7
अभिनेत्री वैष्णवीने सांगितलं, "फिल्मच्या शूटिंगनंतर मी हैदराबादला घरी परतले. मी तेव्हा 9 वर्षांची होते, चौथीत होते. तो शनिवार होता आणि मी शाळेतून घरी जात होते. मला रस्त्यावर एक अंडं दिसलं आणि मी ते उचलून घरी नेलं. त्यावर हळद आणि कुंकू लावलं होतं. मी ते माझ्या हेल्परला दाखवलं. तर तिने ते का उचललं, असं काही उचलू नकोस, असं म्हटलं. नंतर ती म्हणाली आता ते तोडू नकोस, पण त्याच क्षणी माझ्या हातातून ते अंड निसटलं आणि खाली पडून फुटलं"
advertisement
5/7
वैष्णवी पुढे म्हणाली, "ज्या दिवशी अंडं फुटलं, त्याच रात्री मी झोपेत चालायला सुरुवात केली, मला आठवतं की मी शुद्धीवर होते, मी घरात फिरत होते, मला माहिती होतं की मी चालते आहे, माझं घर बंगल्यासारखं होतं आणि मी कॉरिडॉरवरून जाताना म्हणायचे, 'माझे कपडे तयार कर...'.
advertisement
6/7
असं सुमारे एक महिना चालू राहिले. शेवटी माझ्या घरी कोणालातरी बोलावण्यात आलं, ज्याने माझ्या आत काहीतरी बाहेर काढलं". असं ती म्हणाली.
advertisement
7/7
सूचना : ही माहिती फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. न्यूज18मराठी या दाव्याचं समर्थन करत नाही. कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा न्यूज18मराठीचा उद्देश नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्या आतून कुणालातरी बाहेर काढलं', हॉरर फिल्मच्या शूटिंगनंतर शरीरात भूत घुसल्याचा अभिनेत्रीचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल