बॅट विकत घ्यायला पैसे नव्हते, आईने दागिने विकले, 32 बॉलमध्ये सेंच्युरी मारणारा Sakibul Gani कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज बिहारने 397 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने अरूणाचल प्रदेशचा पराभव केला आहे. बिहारच्या विजयात अनेक खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली, पण सर्वाधिक चर्चा ही सकिबुल गनीची रंगली आहे.
advertisement
1/7

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज बिहारने 397 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने अरूणाचल प्रदेशचा पराभव केला आहे. बिहारच्या विजयात अनेक खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली, पण सर्वाधिक चर्चा ही सकिबुल गनीची रंगली आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
2/7
सकिबुल गनी हा बिहारचा कर्णधार आहे. त्याने अरूणाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात 32 बॉलमध्ये शतक ठोकले होते. अशाप्रकारे तो विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वेगवान शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.
advertisement
3/7
सकिबुल गनीने अरूणाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात 32 बॉलमध्ये 128 धावांची नाबाद खेळी केली होती.या खेळीत त्याने 12 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.
advertisement
4/7
विशेष म्हणजे सकिबुल गनीने ही खेळी करून ईशान किशनचा 33 बॉलमधील शतकाचा रेकॉर्ड मोडला आहे. यासह लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा गनी हा सर्वात वेगवान भारतीय खेळाडू आहे. मॅकगर्क आणि डिव्हिलियर्सनंतर तो जगातील तिसरा सर्वात वेगवान खेळाडू बनला आहे.
advertisement
5/7
सकिबुलचा जन्म 2 सप्टेंबर 1999 ला बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात झाला होता. त्याच्या क्रिकेटची सुरूवात खूप मोठ्या अशा क्रिकेट सेंटरमधून झाली नव्हती, तर स्थानिक क्रिकेट सेंटरमधून त्याची सूरूवात झाली.
advertisement
6/7
दरम्यान अंडर 19 स्पर्धेत शानदार खेळी करून त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर रणजीत त्याने मिझोरम विरूद्ध डेब्यू सामन्यात 341 धावांची ऐतिहासिक खेळी कोली होती. हा डेब्यूमध्ये तिहेरे शतक ठोकण्याचा अनोखा रेकॉर्ड होता. विशेष म्हणजे गनी फर्स्ट क्लास डेब्यूमध्ये तिहेरी शतक ठोकणारा जगातला पहिला खेळाडू बनला.
advertisement
7/7
सकिबुल गनीचा क्रिकेटमध्ये येण्याचा प्रवास फारसा सोप्पा नव्हता. कारण त्याच्याकडे बॅट विकत घ्यायला देखील पैसे नव्हते. कारण कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक होती. त्यामुळे आईने दागिने गहान ठेवून बॅट घेतली होती. विशेष म्हणजे आईने तीन बॅट दिल्यानंतर गनीला सांगितलं,जा मुला, तीन शतक मारू ये.त्यानंतर गनीने मैदानात जाऊल हा कारनामा केला होता,असे सकिबुल गनीचा भाऊ म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बॅट विकत घ्यायला पैसे नव्हते, आईने दागिने विकले, 32 बॉलमध्ये सेंच्युरी मारणारा Sakibul Gani कोण?