SL vs ZIM : झिम्बाबेच्या विजयाने सगळ्यांचीच धडधड वाढली, सूपर 8 मध्ये टीम इंडियासह 2 टीमना धोक्याची घंटा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सूपर 8 मधल्या सगळ्याच संघांना झिम्बाबेने धडकी भरवली आहे. विशेष म्हणजे या झिम्बाबेचा सर्वाधिक धोका हा टीम इंडियासह दोन संघांना आहे.
advertisement
1/8

टी20 वर्ल्डकपमध्ये आज झिम्बाबेने श्रीलंकेचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून झिम्बाबेने हा सामना 6 विकेटने जिंकला आहे.
advertisement
2/8
झिम्बाबेच्या या विजयात ब्रायन बेनेटने सर्वाधिक 60 धावांची नाबाद तर सिंकदर रझाने 26 बॉलमध्ये 45 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावरच झिम्बाबने हा उलटफेर करून दाखवला आहे.
advertisement
3/8
खरं तर या विजयानंतर झिम्बाबे ग्रुप 2 मध्ये टॉपला पोहोचला आहे.त्याच्या खालोखाल श्रीलंका, आयलँड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत. या विजयाचा सूपर 8 च्या समीकरणावर फारसा फरक पडणार नाही आहे.
advertisement
4/8
दरम्यान असं जरी असलं तरी सूपर 8 मधल्या सगळ्याच संघांना झिम्बाबेने धडकी भरवली आहे. विशेष म्हणजे या झिम्बाबेचा सर्वाधिक धोका हा टीम इंडियासह दोन संघांना आहे.
advertisement
5/8
कारण सूपर 8 मध्ये झिम्बाबेचा पहिला सामना हा 23 फेब्रुवारी 2026 ला वेस्ट इंडिजसोबत असणार आहे. वेस्ट इंडिज तशी तगडी टीम आहेत.त्यामुळे दोघांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे.
advertisement
6/8
त्यानंतर झिम्बाबेचा दुसरा सामना हा 26 फेब्रुवारी 2026 ला भारताशी असणार आहे. या सामन्यात भारताने जर झिम्बाबेला हलक्यात घेतलं तर सूर्याच्या टीमला भारी पडण्याची शक्यता आहे.कारण झिम्बाबेने ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेला हरवून मोठा उलटफेर केला आहे.
advertisement
7/8
झिम्बाबेचा सूपर 8 मधला शेवटचा सामना हा साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. साऊथ आफ्रिकेला झिम्बाबेशी ही लढत सोप्पी जाणार नाही आहे. त्यामुळे सूपर 8 मध्ये या टीमना सर्वाधिक धोका आहे.
advertisement
8/8
सूपर 8 मध्ये दोन सामने जिंकणारे संघ थेट सेमी फायनलमध्ये जाणार आहेत.त्यामुळे झिम्बाबे कोणत्या दोन संघाचे पराभव करते? किंवा त्यांचच आव्हान संपूष्ठात येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
SL vs ZIM : झिम्बाबेच्या विजयाने सगळ्यांचीच धडधड वाढली, सूपर 8 मध्ये टीम इंडियासह 2 टीमना धोक्याची घंटा