11,500 रुपयांनी स्वस्त मिळतोय दमदार iPhone! पहिल्यांदाच मिळतोय कमी किंमतीत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अॅपल चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण क्रोमावर Apple iPhone 16e च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. जाणून घेऊया नवीन किंमती, बँक ऑफर आणि iPhone 16e च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर...
advertisement
1/7

मुंबई : तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, पण तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर ही तुमच्यासाठी बेस्ट संधी आहे. क्रोमा सध्या Apple iPhone 16e वर शानदार डिस्काउंट देत आहे. ज्यामध्ये खरेदीदारांना 11,500 रुपयांपेक्षा जास्त बचत मिळू शकते.
advertisement
2/7
ही डील विशेषतः अशा यूझर्ससाठी फायदेशीर आहे ज्यांना जुन्या iPhone ने अपग्रेड करायचे आहे किंवा पहिल्यांदा अॅपल इकोसिस्टममध्ये एंट्री घ्यायची आहे. लक्षात ठेवा की, अशा ऑफर्स जास्त काळ राहत नाही. यामुळे तुम्हाला इंट्रेस्ट असेल तर संधी सोडू नका.
advertisement
3/7
Apple iPhone 16e ला भारतात 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. सध्या Croma च्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन 52,390 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच थेट 7,510 रुपयांपर्यंत फ्लॅट सूट मिळत आहे.
advertisement
4/7
याव्यतिरिक्त, तुम्ही Axis Bank किंवा ICICI Bank च्या क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. याचा अर्थ iPhone 16e वर एकूण 11,500 रुपयांपेक्षा जास्त बचत होईल.
advertisement
5/7
Apple iPhone 16e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन : Apple iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले दैनंदिन वापरासाठी, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियासाठी चांगला अनुभव देतो. परफॉर्मेंसच्या बाबतीत, iPhone 16e मध्ये Apple च्या लेटेस्ट A18 चिपसेटचा वापर केला जातो.
advertisement
6/7
यासोबतच फोनमध्ये अनेक AI-पॉवर्ड फीचर्स मिळतात. जसे की, इमेज क्लीनअप, इमेज प्लॅग्राउंड, ChatGPT इंटीग्रेशन आणि AI Writing Tools, यो यूझर एक्सपीरियन्सला बेस्ट बनवते. कॅमेऱ्यांसाठी, यात 2x ऑप्टिकल झूमसह 48MPचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MPचा फ्रंट कॅमेरा आहे.
advertisement
7/7
डिझाइनच्या बाबतीत, फोनमध्ये अॅल्युमिनियम बॉडी आहे आणि तो फेस आयडीला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB-C पोर्ट आहे. फोन IP68 प्रमाणित आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
11,500 रुपयांनी स्वस्त मिळतोय दमदार iPhone! पहिल्यांदाच मिळतोय कमी किंमतीत