Apple Watch 10 झाली लॉन्च, आहे स्लिम; पाहा यात कोणते हेल्थ फीचर्स?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Apple ने सोमवारी त्यांच्या इव्हेंटदरम्यान Apple Watch Series 10 लॉन्च केली. कंपनीने या वॉचला सर्वात स्लिम स्मार्टवॉच असं म्हटलंय. यात फास्ट चार्जिंग आणि नवीन वॉच फेस देण्यात आलेय. Apple Watch Series 10 चे केस दोन साइजमध्ये उपलब्ध असतील. त्यापैकी एक 42 मिमी आणि दुसरा 46 मिमी आहे. जाणून घेऊयाविषयी डिटेल्स...
advertisement
1/9

Apple ने सोमवारी त्यांच्या कार्यक्रमादरम्यान Apple Watch Series 10 लॉन्च केली. ही सर्वात स्लिम स्मार्टवॉच असल्याचं कंपनीने म्हटलंय. यात फास्ट चार्जिंग आणि नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. 50 मीटर पर्यंत वॉटर रेजिस्टेंट ही वॉच आहे.
advertisement
2/9
कंपनीने म्हटलंय की, ते जुन्या व्हर्जनपेक्षआ अधिक अॅक्युरेसी प्रदान करेल आणि यामध्ये यूझर्सना चांगली ब्राइटनेस आणि मोठा डिस्प्ले मिळेल. हे घड्याळ वजनानेही हलके आहे आणि यात तुम्हाला तीन रंगांचे ऑप्शन मिळतात.
advertisement
3/9
30 मिनिटांत 80 टक्के चार्ज : Apple Watch Series 10 बद्दल कंपनीचा दावा आहे की ते फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. यामध्ये तुम्हाला टायटॅनियम घड्याळाचा ऑप्शनही मिळेल. तुम्ही ते तीन रंगांच्या ऑप्शनमध्ये देखील खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला नवीन स्ट्रॅप देण्यात येतील.
advertisement
4/9
वॉच सिरीज 9 पेक्षा स्लिम आणि हलकी: Apple Watch Series 10 ची जाडी फक्त 9.7 मिलीमीटर आहे. Apple Watch Series 9 च्या तुलनेत, ते 10 टक्के स्लिम आणि 10 टक्के हलके आहे. Apple ने सांगितले की यात एक मोठी OLED स्क्रीन आहे, ज्याच्या मदतीने यूझर्स घड्याळावरील टेक्स्ट आणि इतर कंटेंट सहजपणे पाहू शकतील. तसेच, येथे यूझर्स सहजपणे मेसेज इत्यादी वाचण्यास सक्षम असतील.
advertisement
5/9
तुम्हाला दोन आकाराचे केस मिळतील :Apple Watch Series 10 चे केस दोन आकारात उपलब्ध असतील. यापैकी एक 42 मिमी आणि दुसरा 46 मिमी आहे. याला पॉवर देण्यासाठी, नवीन S10 SiP (System in Package) सह 4 कोअर न्यूरल इंजिन प्रदान करण्यात आले आहे.
advertisement
6/9
Apple Watch Series 10 मध्ये पॉलिश ॲल्युमिनियम फिनिश आहे आणि बॅक पॅनलवर न्यू मेटलचा वापर करण्यात आलाय. हे वॉटर रेसिस्टेंस आहे आणि 50 मीटर खोलीपर्यंत बुडू शकते.
advertisement
7/9
ॲपल वॉचमध्ये पहिल्यांदाच आलेय हे फीचर : Apple Watch Series 10 हे Sleep Apnea Detection चे फीचर असणारे पहिले घड्याळ असेल. मात्र कंपनी अजूनही FDA च्या मंजुरीची वाट पाहतेय. घड्याळाच्या एक्सेलेरोमीटरच्या मदतीने ते झोपेत असताना यूझर्सच्या ब्रीथिंगला एननालाइज करेल. स्लीप एपनिया ही एक विशेष प्रकारची स्थिती आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान लोकांचा श्वास थांबतो. अशा स्थितीत, हे घड्याळ रुग्णाचे हार्ट रेट, ब्रीथिंग पॅटर्न आणि ब्रेन अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवेल.
advertisement
8/9
Apple Watch Series 10 ची किंमत:Apple Watch Series 10 ची सुरुवातीची किंमत 399 अमेरिकी डॉलर आहे. 20 सप्टेंबरपासून ते विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्याच वेळी, जीपीएस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 499 यूएस डॉलर आहे.
advertisement
9/9
चांगल्या कामगिरीसाठी ऍपल:यामध्ये S10 चिप वापरण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर्स मिळतील. यात क्रॅश डिटेक्शन सारखे फीचर्स मिळतील. यामध्ये तुम्ही डबल टॅप सारख्या फीचर्सचा वापर करू शकाल. हे डिव्हाइस WatchOS 11 सह येईल. यामध्ये तुम्हाला अनेक मशीन लर्निंग फीचर्स मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Apple Watch 10 झाली लॉन्च, आहे स्लिम; पाहा यात कोणते हेल्थ फीचर्स?