TRENDING:

Apple यूझर्ससाठी हाय-रिस्क वॉर्निंग! अजिबात उशीर न करता करा 'हे' काम

Last Updated:
आयफोन, आयपॅड, मॅक, अ‍ॅपल टीव्ही आणि अ‍ॅपल व्हिजन प्रो मधील सुरक्षा त्रुटी शोधून काढत, सीईआरटी-इनने अ‍ॅपल यूझर्ससाठी हाय-रिस्क इशारा जारी केला आहे.
advertisement
1/6
Apple यूझर्ससाठी हाय-रिस्क वॉर्निंग! अजिबात उशीर न करता करा 'हे' काम
नवी दिल्ली : तुमच्याकडे आयफोन, आयपॅड, मॅक, अ‍ॅपल टीव्ही किंवा अ‍ॅपल व्हिजन प्रो असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अॅपल यूझर्ससाठी हाय-सेवेरिटी इशारा जारी केला आहे. कारण? CERT-In च्या संशोधकांनी Apple डिव्हाइसेसमध्ये अनेक धोकादायक सुरक्षा त्रुटी शोधून काढल्या आहेत. ज्या हॅकर्सनी वापरल्यास ते तुमच्या डिव्हाइसमध्ये घुसू शकतात, तुमचा डेटा चोरू शकतात किंवा तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण देखील घेऊ शकतात.
advertisement
2/6
CERT-In ने व्हल्नरेबिलिटी नोट CIVN-2025-0071 मध्ये आपल्या शोधाचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांच्या इशाऱ्यात, त्यांनी अनेक अ‍ॅपल उत्पादनांना प्रभावित करणाऱ्या सुरक्षा त्रुटींवर प्रकाश टाकला आहे आणि यूझर्सना त्यांचे डिव्हाइस त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. CERT-In च्या मते, आढळलेल्या त्रुटींचा फायदा घेत, हल्लेखोर संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करू शकतात, अनियंत्रित कोड चालवू शकतात. सुरक्षा संरक्षणांना बायपास करू शकतात, उच्च विशेषाधिकार मिळवू शकतात, डेटा हाताळू शकतात किंवा स्पूफिंग आणि डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ले देखील करू शकतात.
advertisement
3/6
कोणाला धोका आहे? : हा सल्ला वैयक्तिक यूझर्ससाठी आणि Apple डिव्हाइस वापरणाऱ्या संस्थांसाठी आहे. वर उल्लेख केलेल्या iOS, macOS, Safari किंवा इतर Apple प्लॅटफॉर्मच्या जुन्या व्हर्जन वापरणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात. यामध्ये आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अ‍ॅपल टीव्ही आणि अ‍ॅपल व्हिजन प्रो हेडसेट सारख्या अनेक उपकरणांचा समावेश आहे. CERT-In ने यूझर्सना त्यांचे डिव्हाइस त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक अपडेट्सशिवाय, यूझर्सना डेटा उल्लंघन, डिव्हाइस नियंत्रण गमावणे आणि सेवा व्यत्यय येण्याचा धोका असतो. या त्रुटी खालील Apple सॉफ्टवेअर व्हर्जनवर परिणाम करतात:
advertisement
4/6
iOS: वर्जन 18.4, 17.7.6, 16.7.11, आणि 15.8.4 यापूर्वीचे व्हर्जन. यासोबतच iPadOS व्हर्जन 18.4, 17.7.6, 16.7.11, आणि 15.8.4 पूर्वीचे व्हर्जन.
advertisement
5/6
macOS: Sequoia व्हर्जन 15.4 पूर्वीचे, Sonoma व्हर्जन 14.7.5 चे पूर्वीचे, आणि Ventura व्हर्जन 13.7.5 पूर्वीचे. tvOS: व्हर्जन 18.4 च्या पुर्वीचे visionOS व्हर्जन 2.4 च्या पूर्वीचे Safari ब्राउजर व्हर्जन 18.4 च्या पूर्वीचे. Xcode व्हर्जन 16.3 च्या पूर्वीचे.
advertisement
6/6
ते कसे टाळायचे? : हा धोका टाळण्यासाठी, तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये लेटेस् अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. म्हणून तुमचे डिव्हाइस शक्य तितक्या लवकर अपडेट करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Apple यूझर्ससाठी हाय-रिस्क वॉर्निंग! अजिबात उशीर न करता करा 'हे' काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल