Fan Science : सिलिंग फॅन आणि टेबल फॅन उलट का फिरतात? दोघेही हवाच देतात, मग फिरण्याची दिशा वेगळी का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फार कमी लोक याकडे लक्ष देतात. पण हे दोन्ही पंखे वेगवेगळ्या दिशेने फिरतात.
advertisement
1/6

आजच्या काळात प्रत्येक घरात एसी असो वा नसो, पण एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे पंखा. उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आणि हवेची हालचाल ठेवण्यासाठी पंखा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काहीजणांच्या घरात छताला लावलेले सीलिंग फॅन असतात, तर काही जण टेबल फॅन वापरतात. दोन्ही पंख्यांचा उद्देश आपल्याला हवा देणे हाच असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की हे दोन्ही पंखे वेगळ्या प्रकारे काम करतात?
advertisement
2/6
फार कमी लोक याकडे लक्ष देतात. पण हे दोन्ही पंखे वेगवेगळ्या दिशेने फिरतात. सामान्यतः छतावरील पंखा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने (anticlockwise) फिरतो, तर टेबल फॅन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (clockwise) फिरतो. दोन्ही पंखे हवा देतात, तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत हा फरक का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
advertisement
3/6
या फरकाचे मूळ कारण त्यांच्या रचनेत आणि काम करण्याच्या तंत्रात दडलेले आहे.
advertisement
4/6
सीलिंग फॅनमध्ये ब्लेड हे मोटरला जोडलेले असतात. यामुळे संपूर्ण मोटर फिरत असताना ब्लेड घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. येथे मोटर फिरणारा भाग असतो आणि आर्मेचर (ज्यावर मोटर) स्थिर असतो.
advertisement
5/6
टेबल फॅनमध्ये मात्र परिस्थिती उलट असते. येथे ब्लेड हे आर्मेचरला जोडलेले असतात, जो फिरणारा भाग असतो, आणि मोटर स्थिर राहते. त्यामुळे टेबल फॅनची ब्लेड घड्याळाच्या दिशेने फिरतात.
advertisement
6/6
फिरण्याची दिशा आणि यंत्रणेत फरक असला तरी दोन्ही पंख्यांचं कार्य तेच आहे. आपल्याला हवा पुरवणे आणि खोलीतील हवा फिरवणे. या दोन वेगळ्या तांत्रिक रचनांमुळे पंख्यांचे फिरण्याचे नियम बदलतात, पण परिणाम तोच राहतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Fan Science : सिलिंग फॅन आणि टेबल फॅन उलट का फिरतात? दोघेही हवाच देतात, मग फिरण्याची दिशा वेगळी का?