फक्त 2 मिनिटांत वाढवा अँड्रॉइड फोनची स्पीड! या आहेत 4 सीक्रेट सेटिंग्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचा अँड्रॉइड फोन स्लो चालत असेल तर डेव्हलपर ऑप्शनच्या 4 सेटिंग्सने तुम्ही फोनची स्पीड वाढवू शकता. चला जाणून घेऊया ही ट्रिक नेमकी काय...
advertisement
1/9

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या डेली लाइफचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या जीवनातील जास्तीत जास्त काम आता स्मार्टफोनवरच अवलंबून असतात. अशावेळी आपला फोन स्पीडने चालणे खुप गरजेचे असते. फोनचा परफॉर्मेंस चांगला असेल आणि स्मार्टफोन स्मूद चालवा यासाठी फोनमध्ये अशा काही सेटिंग्स असतात ज्यांच्याविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती नसते. आज आपण अशाच एका सेटिंग्सविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
2/9
तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये डेव्हलपर ऑप्शन्स नावाचा एक सेक्शन आहे. नावावरून असे वाटेल की, ते फक्त अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी आहे. हे काही प्रमाणात खरे आहे, परंतु त्यात नियमित यूझर्ससाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक सेटिंग्ज देखील आहेत.
advertisement
3/9
तुम्ही या सेटिंग्स योग्य पद्धतीने सेट करुन घेतल्या तर तुम्हाला फोनमध्ये स्मूद परफॉर्मेंस पाहायला मिळेल.
advertisement
4/9
बॅकग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटी लिमिटेड करा: अँड्रॉइडवर मल्टीटास्किंग केल्याने अनेक कामे सोपी होतात, परंतु त्यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवर अतिरिक्त दबाव येतो.
advertisement
5/9
यामुळे डेव्हलपर मोडमध्ये जा आणि बॅकग्राउंड प्रोसेस लिमिटला 2 किंवा त्यापेक्षा कमीवर सेट करा. यामुळे एकाच वेळी अनेक अॅप्स ओपन होणार नाहीत आणि तुमचा फोन स्मूद पद्धताने चालत राहील.
advertisement
6/9
लॉगर बफरचा आकार कमी करा: तुमचा फोन तुमच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीला रेकॉर्ड करतो. हे फीचर डेव्हलपर्ससाठी उपयुक्त आहे, परंतु सामान्य यूझर्ससाठी फारसे उपयुक्त नाही. अँड्रॉइडमध्ये डिफॉल्टनुसार मोठा बफर आकार असतो, याचा अर्थ ते अधिक फोन मेमरी वापरते आणि CPU वर अतिरिक्त ताण पडतो. हे कमी करण्यासाठी, लॉगर बफरचा आकार 64K किंवा 256K वर सेट करा. तुम्ही ते पूर्णपणे बंद देखील करू शकता.
advertisement
7/9
फोर्स पीक रिफ्रेश रेट: तुम्हाला बॅटरी लाइफबद्दल जास्त काळजी नसेल, तर ही सेटिंग तुमचा फोन अधिक स्मूथ बनवू शकते. तुमच्या फोनचा रिफ्रेश रेट जास्त असला तरीही, बॅटरी वाचवण्यासाठी अँड्रॉइड कधीकधी तो कमी करते.
advertisement
8/9
यापासून बचावासाठी तुम्ही फोर्स पीक रिफ्रेश रेट ऑप्शनला ऑन करु शकता. यामुळे सोशल मीडियावर स्क्रॉल करण्याचा अनुभव जास्त स्मूद आणि मजेदार होईल.
advertisement
9/9
अ‍ॅनिमेशन स्केल बदला: अ‍ॅप ट्रान्झिशन्स असोत किंवा मेनू पॉप-अप असोत, अ‍ॅनिमेशन महत्त्वाचे आहेत. हे अ‍ॅनिमेशन हाय-एंड फोनवर उत्तम काम करतात, परंतु ते मध्यम श्रेणीच्या किंवा एंट्री-लेव्हल फोनवर प्रोसेस मंदावू शकतात. तुम्ही डेव्हलपर ऑप्शन्समध्ये हे अ‍ॅनिमेशन पूर्णपणे कमी किंवा बंद करू शकता, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता वाढू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
फक्त 2 मिनिटांत वाढवा अँड्रॉइड फोनची स्पीड! या आहेत 4 सीक्रेट सेटिंग्स