Jio Recharge Plan: 11 रुपयांत मिळतोय 10 जीबी डेटा! जिओचा जबरदस्त प्लॅन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio Prepaid Recharge Plan: रिलायन्स जिओने आपल्या यूझर्ससाठी एक नवीन आणि रोमांचक प्लॅन लॉन्च केली आहे. यामध्ये केवळ 11 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा दिला जाईल. या प्लॅन अंतर्गत यूजर्स बेस पॅकशिवायही इंटरनेट वापरू शकतील.
advertisement
1/10

नवी दिल्ली : तुमची डेली डेटा लिमिट संपली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. रिलायन्स जिओने चित्रपट प्रेमी आणि इंटरनेट यूझर्ससाठी एक उत्तम प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी फक्त 11 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा देत आहे.
advertisement
2/10
डेटाच्या बाबतीत हा आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लान असल्याचे बोलले जातेय. कंपनी या प्लॅनमध्ये 4G डेटा देईल, ज्याचा वापर इंटरनेट ब्राउझिंग, चित्रपट पाहणे किंवा व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी केला जाऊ शकतो.
advertisement
3/10
Jio ने लॉन्च केलेल्या नवीन प्लॅनमध्ये 11 रुपयांमध्ये 10 GB 4G डेटा दिला जाईल. हा प्लॅन तुमच्या रेग्युसर प्लॅनसोबत वापरला जाऊ शकतो. ज्या युजर्सची डेली डेटा लिमिट संपली आहे ते हा पॅक वापरू शकतात.
advertisement
4/10
यामध्ये मिळालेला डेटा इंटरनेट कॉलिंग किंवा ब्राउझिंगसाठी वापरता येईल. चित्रपट पाहणाऱ्या किंवा डाऊनलोड करणाऱ्यांसाठी हा पॅक अतिशय उपयुक्त ठरेल.
advertisement
5/10
जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 1 तासाची असेल. या प्लॅनची ही एकमेव लिमिट आहे, कारण कंपनी तुम्हाला फक्त 1 तासासाठी 10 GB डेटा देईल. पण, जर तुम्ही एखादी मोठी फाईल डाउनलोड करत असाल किंवा चित्रपट डाउनलोड करत असाल तर हा पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
6/10
तुम्हाला 1 GB डेटासाठी 12 ते 15 रुपये द्यावे लागतील, त्यामुळे तुम्हाला 11 रुपयांमध्ये 10 GB मिळत असेल तर तो अजिबात तोट्याचा सौदा नाही.
advertisement
7/10
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त इंटरनेट सेवा दिली जाईल, तुम्हाला व्हॉईस कॉल करण्याचा ऑप्शन मिळणार नाही. होय, तुम्ही WhatsApp कॉलिंग किंवा मेसेजिंग करू शकता. ज्यांचा बेस प्लॅन संपला आहे अशा यूजर्सना देखील याचा वापर करता येईल.
advertisement
8/10
म्हणजेच ते वापरण्यासाठी तुम्हाला बेस प्लॅनची गरज नाही. एवढेच नाही तर तुमचा सध्याचा प्लॅन चालू असला तरी त्याचा वापर करता येईल.
advertisement
9/10
या प्लॅनची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचा वापर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही यूझर्स करू शकतात. कंपनीने सांगितले की, पोस्टपेड यूजर्सना 11 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा देखील दिला जाईल.
advertisement
10/10
हा प्लॅन MyJio ॲप किंवा जिओ वेबसाइटवरून रिचार्ज केले जाऊ शकते. या पॅकची खासियत म्हणजे बेस पॅक प्लॅनसोबत किंवा त्याशिवाय वापरता येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Jio Recharge Plan: 11 रुपयांत मिळतोय 10 जीबी डेटा! जिओचा जबरदस्त प्लॅन