उन्हाळ्यात 90% टक्के लोक करतात फ्रीजची 'ही' चूक! तुम्हीही करत असाल तर सावधान, वाढू शकतं वीज बिल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळा सुरू झाला की, आपण आपली काळजी घेतो. तशीच घरातील उपकरणांचीही घ्यायला हवी. कारण उष्णतेचा परिणाम हा इलेक्ट्रिक डिव्हाइसवरही होत असतो. आज आपण फ्रिजच्या काही महत्त्वाच्या टिप्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/9

Fridge Distance From Wall: तीव्र उन्हाळा सुरू झालाय. या काळात एसी-कूलर प्रमाणेच फ्रिजही अत्यंत गरजेचं असतं. कारण उन्हाळ्यात गारेगार पाणी पिण्यासाठी, ज्यूस ठेवण्यासाठी फ्रिज आवश्यकच असतो. पण फ्रिज वापरताना त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
advertisement
2/9
खुप कमी लोकांना माहिती असतं की, घरात फ्रिज ठेवावं कसं. अनेकदा लोकं हे फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवतात. तर काही लोक एक किचनच्या हवा येत नसलेल्या कोपऱ्यात फ्रिज ठेवतात.
advertisement
3/9
तुमची ही लहानशी चूक तुमच्या वीज बिलात वाढ करू शकते. ज्यामुळे फ्रिजची लाइफ ही कमी होऊ शकते. उन्हाळ्यात उष्णता जास्त असते. ज्यामुळे ही चूक आणखीच हानिकारक ठरते. यामुळे फ्रिज ठेवण्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेणं खुप गरेजचं आहे.
advertisement
4/9
फ्रिज भिंतीपासून दूर ठेवणं का गरजेचं? : फ्रिजच्या भागे एक महत्त्वाचा भाग असतो. ज्याला कंडेंसर कॉइल म्हणतात. याचं काम फ्रिजच्या आत तयार होणारी उष्णता बाहेर काढणं असतं. ज्यावेळी फ्रिज चालतो तेव्हा उष्णता मागच्या बाजूने निघते.
advertisement
5/9
तुम्ही फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवला असेल तर उष्ण हवा ही बाहेर निघण्यासाठी पुरेसी जागा मिळत नाही. अशावेळी फ्रिजच्या कंप्रेसरवर अतिरिक्त दबावयेतो. ज्यामुळे फ्रिजला जास्त मेहनत करावी लागते. याचा थेट परिणाम वीजेच्या वापरावर होतो. यासोबतच प्रिज लवकर खराब होते.
advertisement
6/9
फ्रिज आणि भिंतीत किती अंतर असावं? : घरगुती उपकरणांचे विशेषज्ञांनुसार, फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवू नये. सामान्यतः फ्रिज आणि भिंतीमध्ये किमान 6 ते 10 इंच अंतर ठेवणं योग्य मानलं जातं. फ्रिजच्या वर कॅबिनेट असेल किंवा काही साहित्य ठेवलं असेल तर अंतर हे 10 ते 12 इंच दूर असावं. यासोबतच फ्रिजच्या दोन्हीही बाजूने साहित्य ठेवलं असेल तर अंतर 1 ते 2 इंच असायला हवं. ज्यामुळे हवा वेगाने सर्कुलेट होत राहील.
advertisement
7/9
वीज बचत करण्यासाठी 'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष : फ्रिज फक्त भिंतीपासून दूर ठेवल्याने काम होत नाही. तर काही सवयी स्वीकारल्याने वीज बचत करण्यात मदत होते. फ्रिज खिडकी जवळ किंवा गॅस शेगडीजवळ ठेवू नका. तिथे उष्णता जास्त असते. ज्यामुळे फ्रिजची कूलिंग टिकवून ठेवण्यासाठी जास्त वीज खर्च करावी लागते.
advertisement
8/9
जेवढ्या वेळा दार उघडाल बील तेवढंच वाढेल : अनेक लोक फ्रिजचं दार हे वारंवार उघडतात. ही योग्य सवय नाही. फ्रिज वारंवार उघडल्याने आतील गार हवा की, बाहेर निघते. फ्रिजला पुन्हा गार हवा तयार करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे वीजेचा वापर वाढतो आणि कंप्रेसरवरही परिणाम होतो.
advertisement
9/9
गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका : गरम असलेले दूध किंवा अन्न पदार्थ हे तसेच फ्रिजमध्ये ठेवू नका. आधी ते घराच्या तापमानात गार होऊ द्या. नंतर फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही गरम फ्रिजमध्ये ठेवले तर फ्रिजमधील तापमान अचानक वाढते. फ्रिजला ते गार करण्यासाठी जास्त वीज वापरावी लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
उन्हाळ्यात 90% टक्के लोक करतात फ्रीजची 'ही' चूक! तुम्हीही करत असाल तर सावधान, वाढू शकतं वीज बिल