TRENDING:

Valentine's Day साठी गिफ्ट शोधताय? द्या Apple चे हे प्रोडक्ट्स, दिवस होईल स्पेशल

Last Updated:
Valentine's Day जवळ येताच, प्रेमी युगुल भेटवस्तू शोधायला लागतात. या धावपळीपासून तुम्हाला वाचवण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत.
advertisement
1/6
Valentine's Day साठी गिफ्ट शोधताय? द्या Apple चे हे प्रोडक्ट्स, दिवस होईल स्पेशल
Valentine's Day Gift Idea: प्रेमाचा उत्सव, व्हॅलेंटाईन डे, जवळ येत आहे. तुम्ही या निमित्ताने तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम कल्पना घेऊन आलो आहोत. या प्रसंगी तुम्ही त्यांना Apple ची प्रोडक्ट भेट देऊ शकता. हे केवळ तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग नसेल तर एक अर्थपूर्ण भेट देखील असेल. व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणते अ‍ॅपल प्रोडक्ट गिफ्ट देऊ शकता चला पाहूया.
advertisement
2/6
iPhone 16 : तुम्ही आयफोन 16 भेट देऊन व्हॅलेंटाईन डे खास बनवू शकता. यात 6.1-इंचाचा OLED पॅनेल आहे. जो ट्रू टोन आणि HDR डिस्प्लेला सपोर्ट करतो. अ‍ॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करण्यासाठी हे A18 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. हे 5 कलरमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
3/6
Apple Watch SE : हेल्थ आणि वेलनेस कंपेनियन म्हणून, तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला Apple Watch SE देखील गिफ्ट करु शकता. स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे अनेक फीचर्स त्यात उपलब्ध आहेत. मनगटाची शोभा वाढवण्यासोबतच ते तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या आरोग्यावरही लक्ष ठेवेल. त्याची किंमत 24,900 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
4/6
AirPods 4 (Active Noise Cancellation) : तुमच्या व्हेलेंटाइनला म्यूझिकची आवड असेल तर यापेक्षा चांगली भेट असू शकत नाही. तुम्ही त्याला AirPods 4 भेट देऊन हा दिवस त्याच्यासाठी अधिक खास बनवू शकता. कंपनीच्या या प्रोडक्टमध्ये पर्सनलाइज्ड स्पेटियल ऑडिओ आणि डायनॅमिक हेड ट्रॅकिंग सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला 17,900 रुपये द्यावे लागतील.
advertisement
5/6
HomePod Mini : होमपॉड मिनीत सिंगल फुल-रेंज ड्रायव्हर, ड्युअल पॅसिव्ह रेडिएटर्स आणि 4 मायक्रोफोन आहेत. हे कंप्यूटेशनल ऑडिओला सपोर्ट देते आणि 360-डिग्री साउंड वितरीत करते. सिरी व्हॉइस कमांड वापरून ते कंट्रोल केले जाऊ शकते. स्मार्ट होम फीचर्स नियंत्रित करण्यापासून ते हँड्स-फ्री कॉल्सपर्यंत, ते अनेक फीचर्स देते. यासाठी 10,900 रुपये द्यावे लागतील.
advertisement
6/6
MacBook Air M3 : हे असं गिफ्ट आहे जी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला अनेक व्हॅलेंटाईन डेज उलटून गेल्यानंतरही आठवेल. अनेक प्रगत फीचर्ससह आणि दमदार परफॉर्मेंससह, MacBook Air M3 क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटीला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल. त्याची सुरुवातीची किंमत 1,14,900 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही iPad Air किंवा iPad Mini देखील भेट देऊ शकता. अॅपल अॅप स्टोअरच्या मदतीने तुम्ही अॅपल प्रोडक्टवर तुमचे आवडते नाव आणि नंबर इत्यादी लिहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Valentine's Day साठी गिफ्ट शोधताय? द्या Apple चे हे प्रोडक्ट्स, दिवस होईल स्पेशल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल