TRENDING:

Vivo ने आणला 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत धाकड फोन! 12GB रॅमसह मिळेल जबरदस्त कॅमेरा

Last Updated:
Vivo Y100i चीनमध्ये गुरुवारी लॉन्च करण्यात आला आहे. या लेटेस्ट Y-सीरीज स्मार्टफोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.64-इंचाचा डिस्प्ले आहे. Vivo चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरवर चालतो. याशिवाय, यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
advertisement
1/5
Vivo ने आणला 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत धाकड फोन! 12GB रॅमसह मिळेल भारी कॅमेरा
Vivo Y100i ची किंमत CNY 1,599 (अंदाजे रु. 15,000) 12GB + 512GB व्हेरिएंटसाठी आहे. चीनमध्ये हा फोन पिंक, स्काय ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात फोन लॉन्च करण्याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
advertisement
2/5
Vivo Y100i च्या स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 6.64-इंच फुल-एचडी+ (1,080x2,388 पिक्सेल) डिस्प्ले आहे.
advertisement
3/5
या फोनमध्ये 12GB LPDDR4X रॅम आणि Mali-G57 MC2 सह octa-core 7nm MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आहे. त्याची मेमरी 512GB आहे.
advertisement
4/5
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. याशिवाय येथे 2MP कॅमेरा देखील देण्यात आलाय. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा आहे.
advertisement
5/5
Vivo Y100i ची बॅटरी 5000mAh आहे आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील येथे दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, GPS आणि and A-GPS आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Vivo ने आणला 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत धाकड फोन! 12GB रॅमसह मिळेल जबरदस्त कॅमेरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल