दोघींना डिवोर्स, 3 मुलं एक जावई; वयाची साठी पूर्ण होताच आमिर खानने गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा? PHOTO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Amir Khan Engagement : अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान आमिर खाननं वयाची साठी पूर्ण होताच गुपचूप साखरपुडा उरकल्याचं बोललं जात आहे.
advertisement
1/9

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या साठव्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडची सगळ्यांना ओळख करून दिली होती. त्यानंतर आमिर खान आता तिसऱ्यांदा लग्न करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण त्याचं तिसरं लग्न कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
advertisement
2/9
दरम्यान आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबरोबर गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. आमिर खानकडून यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
3/9
आमिर खानचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. आमिर खानच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. आमिर खानचे दोन डिवोर्स झाले. दोन लग्नात त्याला तीन मुलं आहेत. काही वर्षांआधी त्याला जावई देखील आला आहे.
advertisement
4/9
आता वयाची साठी पूर्ण होताच आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे असं दिसतंय. कारण आमिर खानने गौरीबरोबर साखरपुडा केल्याचं म्हटलं जातं आहे.
advertisement
5/9
आमिर खान काही दिवसांआधीच साठ वर्षांचा पूर्ण झाला आहे. पण प्रेमाच्या बाबतीत तो अजूनही विशीतच आहे. आमिरला याआधी तिसऱ्या लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने मेरी गौरीसे दिल और दिमाग से शादी हुई हैं असं सांगितलं
advertisement
6/9
आमिर खान आणि गौरी स्प्रेट नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात गौरीच्या हातात एक स्पेशल अंगठी पाहायला मिळाली. या अंगठीवरील दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
7/9
गौरीच्या हातातील अंगठी ही जगातील सर्वात रेअर आणि महागड्या दगडांपासून तयार केली जाते. आमिरने अशा दोन अंगठ्या बनवल्या आहेत. QWEEN या लग्झरी ज्वेलरी ब्रँडमधून त्याने अंगठ्या बनवल्या आहेत. हा ब्रँड अजून लाँचही झालेला नाही. तोच आमिर खान त्याचा पहिला ग्राहक बनला आहे.
advertisement
8/9
फोटोमध्ये दिसणाऱ्या पहिल्या अंगठीमध्ये ब्राजीलमधून आणलेला चमकदार निळा एक्वामरीन दिसत आहे. तर दुसऱ्या अंगठीमध्ये मेडागास्करचा हाय क्वालिटी रुबी असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
9/9
आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्याशी झालं. दोघांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. तर आमिरचं दुसरं लग्न किरण रावशी झालं. दोघांना आजाद हा मुलगा आहे. आमिरची लेक आयरा हिचं काही वर्षांआधीच मराठमोळ्या नुपूर शिखरेबरोबर झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दोघींना डिवोर्स, 3 मुलं एक जावई; वयाची साठी पूर्ण होताच आमिर खानने गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा? PHOTO व्हायरल