TRENDING:

WhatsApp आणणार जबरदस्त फीचर! प्रत्येकाला दिसणार नाही तुमचं स्टेटस

Last Updated:
WhatsApp New Feature: तुमचं स्टेटस हे सर्वांनाच दिसू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी व्हॉट्सअॅप एक खास फीचर आणणार आहे. हे फीचर नेमकं काय आहे जाणून घेऊया...
advertisement
1/6
WhatsApp आणणार जबरदस्त फीचर! प्रत्येकाला दिसणार नाही तुमचं स्टेटस
नवी दिल्ली : इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवनवीन फीचर आणत असते. आत व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी एक भारी फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. ज्यामुळे स्टेटस शेअर करणे पहिल्यापेक्षा जास्त पर्सनल आणि सोपं होईल. रिपोर्टनुसार कंपनी क्लोज फ्रेंड्स नावाने एक नवीन ऑप्शन स्टेसट अपडेट्स करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
2/6
आतापर्यंत, व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट करताना, यूझर्सना ते त्यांच्या सर्व कॉन्टॅक्ट्सह शेअर करावे लागत होते किंवा त्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज वारंवार बदलावी लागत होती. परंतु या नवीन फीचरसह, तुम्ही तुमचे स्टेटस फक्त निवडक लोकांसह शेअर करू शकता, म्हणजेच फक्त ज्यांना तुम्ही जवळचे समजता तेच तुमचे फोटो किंवा मेसेज पाहू शकतील.
advertisement
3/6
व्हॉट्सअॅपच्या फीचर्सना ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo नुसार, हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.5.13 मध्ये आढळले आहे. यूझर्स क्लोज फ्रेंड्स लिस्ट तयार करू शकतील. स्टेटस पोस्ट करताना, त्यांना फक्त ही लिस्ट निवडावी लागेल आणि स्टेटस फक्त त्या लोकांपुरते मर्यादित असेल.
advertisement
4/6
व्हॉट्सअॅपमध्ये फ्लेक्सिबिलिटी देखील आहे. यूझर्स स्टेटस प्रायव्हसी सेटिंग्जद्वारे किंवा स्टेटस पोस्ट करताना थेट त्यांच्या जवळच्या मित्रांची लिस्ट मॅनेज करू शकतात. तुम्ही कधीही यादीतून कोणालाही जोडू किंवा काढून टाकू शकता. तसंच, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एकदा एखाद्याने स्टेटस पाहिले की, नंतर त्यांना लिस्टमधून काढून टाकले तरीही ते व्यू परत घेता येत नाही.
advertisement
5/6
व्हॉट्सअॅप व्हिज्युअल मार्किंग्ज देखील सादर करू शकते. स्टेटस वेगळे करण्यासाठी, व्हॉट्सअॅप व्हिज्युअल मार्किंग्ज सादर करू शकते. Close Friendsसाठी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये प्रोफाइल फोटोभोवती वेगळ्या रंगाची रिंग दिसू शकते, जे दाखवते की स्टेटस प्रत्येकासाठी नाही.
advertisement
6/6
कंपनी कस्टम कॉन्टॅक्ट लिस्टवरही काम करत आहे. व्हॉट्सअॅप कस्टम कॉन्टॅक्ट लिस्टवरही काम करत आहे, जिथे यूझर कुटुंब, कामाचे मित्र किंवा इतर कोणत्याही नावाने (इमोजीसह देखील) वेगळे ग्रुप तयार करू शकतील. हे फीचर सध्या डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि सर्व यूझर्ससाठी उपलब्ध नाही. या फीचरची अधिकृत लाँच तारीख समोर आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp आणणार जबरदस्त फीचर! प्रत्येकाला दिसणार नाही तुमचं स्टेटस
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल