प्रत्येक वेबसाइटवर का विचारला जातो CAPTCHA? यामागील सीक्रेट अवश्य घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
What is CAPTCHA: आपण अनेकदा वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जात असतो. यावेळी आपण पाहतो की, वेबसाइटवर लॉगिन, फॉर्म भरणे किंवा पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला CAPTCHA भरावा लागतो. पण का? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7

What is CAPTCHA: आज आपण विविध कामांसाठी इंटरनेटचा वापर करत असतो. यावेळी आपण एखाद्या वेबसाइटवर लॉगिन करतो किंवा फॉर्म भरतो तेव्हा त्यापूर्वी आपल्याला CAPTCHA भरावा लागतो. यामध्ये आपल्याला वाकडे-तिकडे अक्षरं ओळखून लिहायचे सांगितले जातात. पण तुम्ही कधी विचारलाय का की हे असं का विचारतात? यामागे नेमकं काय कारण आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आज आपण याचच सीक्रेट जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
CAPTCHA म्हणजे नेमके काय? : CAPTCHA म्हणजे Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart.. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही एक डिजिटल टेस्ट आहे जी वेबसाइटला यूझर मानव आहे की बॉट (ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर) हे ओळखण्यास मदत करते. बॉट्सचा वापर अनेकदा बनावट अकाउंट तयार करण्यासाठी, स्पॅम पसरवण्यासाठी किंवा डेटा चोरण्यासाठी केला जातो.
advertisement
3/7
बॉट्स विरुद्ध पहिले कवच : इंटरनेटवर दर सेकंदाला लाखो ऑटोमेटेड प्रोग्राम अॅक्टिव्ह असतात. हे बॉट्स वेबसाइटवर बनावट कमेंट पोस्ट करू शकतात, मतदान प्रणाली हाताळू शकतात किंवा सर्व्हर ओव्हरलोड करू शकतात. कॅप्चा हा या बॉट्सना रोखण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे कारण मानव जे सहजपणे करू शकतात ते मशीनसाठी कठीण होते.
advertisement
4/7
सुरक्षेसोबत डेटा सुरक्षाही : CAPTCHA फक्त वेबसाइटला सुरक्षित बनवत नाही तर यूझर्सच्या डेटाची सुरक्षाही करते. एखादा बॉट मोठ्या संख्येत लॉगिन ट्राय करत असेल किंवा फॉर्म सबमिट करत असेल तर डेटा लीक किंवा अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. CAPTCHA अशा हल्ल्याना बऱ्याच अंशी रोखते.
advertisement
5/7
नव्या जनरेशनचा स्मार्ट CAPTCHA : पूर्वी, कॅप्चासाठी फक्त कॅरेक्टर रिकग्निशन आवश्यक होते, परंतु तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आजचे रीकॅप्चा तुमच्या माऊसच्या हालचाली, क्लिकिंग पॅटर्न आणि अगदी ब्राउझिंग पॅटर्नचे विश्लेषण करतात. कधीकधी, फक्त "मी रोबोट नाही" वर क्लिक करणे पुरेसे असते, कारण सिस्टम बॅकग्राउंटमध्ये तुमच्या अॅक्टिव्हिटी पाहून निर्णय घेते.
advertisement
6/7
CAPTCHA हा त्रासदायक आहे का? : अर्थात, वारंवार कॅप्चा भरावा लागणे अनेक लोकांसाठी निराशाजनक असते. विशेषतः जेव्हा सिस्टम योग्य प्रतिमा निवडल्यानंतरही पुन्हा टेस्ट दाखवते. मात्र, या वैशिष्ट्याशिवाय, इंटरनेटवर फसवणूक आणि सायबर गुन्हे झपाट्याने वाढू शकतात.
advertisement
7/7
यामागे लपलंय खरं रहस्य : CAPTCHA चा खरा उद्देश फक्त तुम्ही मनुष्य आहे की नाही हे सिद्ध करणे नाही. तर इंटरनेटला सुरक्षित , विश्वासार्ह आणि स्पॅम-फ्री ठेवण्याचाही उद्देश आहे. ही छोटीशी प्रोसेस आपल्याला ऑनलाइन जगात मोठ्या संकटापासून वाचवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
प्रत्येक वेबसाइटवर का विचारला जातो CAPTCHA? यामागील सीक्रेट अवश्य घ्या जाणून