TRENDING:

घरात कधीही लावू नका हा Wifi Router? दुकानदार चांगला म्हणून विकतो पण तुमचीच होईल फसवणूक

Last Updated:
इंटरनेट ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. आता बहुतांश कामं ऑनलाइन करणं शक्य असल्याने साहजिकच इंटरनेटचा वापर वाढला आहे. तसंच वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लासेस आदी गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर होत आहे. यासाठी घरात विशेष यंत्रणा बसवण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. वेगवान आणि अनलिमिटेड इंटरनेटसाठी घरात राउटर बसवला जातो. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन अनेक कंपन्यांचे राउटर्स बाजारात उपलब्ध आहेत; पण राउटर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा सरकार तुमच्यावर कारवाई करू शकतं. राउटर वापरताना काय काळजी घ्यावी ते सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
1/6
घरात कधीही लावू नका हा Wifi Router? दुकानदार विकतो पण तुमचीच होईल फसवणूक
सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरात वेगवान आणि अनलिमिटेड इंटरनेट वापरता यावं यासाठी राउटर बसवला जातो. यामुळे घरातली एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस राउटरला कनेक्ट करून इंटरनेट वापरता येतं.
advertisement
2/6
जेव्हा तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन राउटर खरेदी करता तेव्हा त्यावर बँडचा तपशील लिहिलेला असतो. हा तपशील खरेदीवेळी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.
advertisement
3/6
सामान्यपणे बाजारात ड्युएल बँड असलेले राउटर मिळतात. याची बँडविड्थ 2.4GHz/5GHz असते. भारतात केवळ 2.4GHz आणि 5GHz स्पेक्ट्रम बँड असलेल्या वाय-फाय राउटरची विक्री करण्यास परवानगी आहे.
advertisement
4/6
आता नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाय-फाय 6E स्पेक्ट्रम बँड असलेले राउटरदेखील बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेले सर्व राउटर हे तीन स्पेक्ट्रम बँड अर्थात रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करतात.
advertisement
5/6
तुम्ही जर घरात इंटरनेटकरिता नवीन वाय-फाय 6E तंत्रज्ञान असलेला राउटर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. या तंत्रज्ञानावर आधारित राउटरचा वापर केल्यास टेलिकॉम कायद्यातल्या तरतुदींनुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
advertisement
6/6
सरकारने देशात या तंत्रज्ञानावर आधारित वाय-फाय राउटर्सच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन राउटर खरेदी करत असाल तर त्यावरचा बँडचा तपशील काळजीपूर्वक वाचा आणि 6E तंत्रज्ञान असलेला राउटर घरात वापरणं टाळा.राहतील, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
घरात कधीही लावू नका हा Wifi Router? दुकानदार चांगला म्हणून विकतो पण तुमचीच होईल फसवणूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल