TRENDING:

रात्रीभर फोन चार्जिंगला ठेवणाऱ्यांनो सावधान; ही सवय किती महाग पडू शकते माहितीय? एकदा हे वाचा

Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का की रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपण्याची ही सवय तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसाठीच नाही तर तुमच्या सुरक्षेसाठीसुद्धा धोकादायक ठरू शकते?
advertisement
1/7
रात्रीभर फोन चार्जिंगला ठेवणाऱ्यांनो सावधान; ही सवय किती महाग पडू शकते माहितीय?
आजकाल बहुतेक लोक रात्री झोपण्यापूर्वी आपला फोन चार्जला लावून निर्धास्त झोपतात, जेणेकरून सकाळी उठल्यावर 100% बॅटरी मिळेल. शिवाय सकाळच्या घाईत फोन चार्ज करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे कधीकधी चार्जिंग विसरलं तर मग फोन घेऊन घरातून निघता येणार नाही. कारण हल्ली फोनशिवाय कोणतंच काम करणं शक्य नाही.
advertisement
2/7
पण तुम्हाला माहीत आहे का की रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपण्याची ही सवय तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीसाठीच नाही तर तुमच्या सुरक्षेसाठीसुद्धा धोकादायक ठरू शकते? जर तुम्हीही असे करत असाल, तर ही छोटीशी चुक तुमच्या फोनचं आयुष्य कमी करू शकते आणि काही वेळा जीवघेणंही ठरू शकतं. चला, जाणून घेऊया का रात्रभर फोन चार्जिंगला ठेवणं नुकसानदायक आहे.
advertisement
3/7
सततच्या चार्जिंगमुळे बॅटरीवर ताण येतोस्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी असते. जेव्हा फोन 100% चार्ज होतो आणि तरीही चार्जला लावलेला राहतो, तेव्हा बॅटरीमध्ये ओव्हरचार्जिंग स्ट्रेस निर्माण होतो. यामुळे तिचं चार्ज सायकल आयुष्य कमी होतं, म्हणजेच काही काळानंतर बॅटरी आधीसारखी चार्ज होल्ड करणं थांबवते आणि फोन पटकन डिस्चार्ज होऊ लागतो.
advertisement
4/7
जास्त तापमानामुळे होऊ शकतो धोकाफोन रात्रीभर चार्जला ठेवला की त्यातून उष्णता निर्माण होते. दीर्घकाळ अशी उष्णता राहिल्याने बॅटरीसह फोनच्या आतील सर्किटलाही हानी पोहोचू शकते. काही प्रसंगी फोनचा ओव्हरहिट होणं म्हणजेच आग लागणं किंवा ब्लास्ट होणं यासारखे प्रकार घडतात. विशेषतः जेव्हा लोक स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरतात.
advertisement
5/7
वीजेतील चढ-उतार घडवू शकतो मोठं नुकसानरात्रीच्या वेळी वीजेचं व्होल्टेज अचानक वाढलं किंवा घटलं तर त्याचा फटका थेट फोनच्या चार्जिंग पोर्ट, बॅटरी किंवा मदरबोर्डला बसू शकतो. कारण आपण झोपेत असतो, त्यामुळे या प्रकारच्या धोका लक्षात येत नाही आणि नुकसान अधिक वाढतं.
advertisement
6/7
योग्य चार्जिंग करण्याचा मार्गतज्ज्ञांच्या मते, फोनला नेहमी 100% चार्ज करण्याची गरज नसते. फोनचं चार्जिंग 20% ते 80% दरम्यान ठेवणं सर्वात योग्य मानलं जातं. यामुळे बॅटरीवर ताण येत नाही आणि तिचं आयुष्य वाढतं. जर रात्री चार्ज करणं आवश्यक असेल, तर अशा स्मार्ट चार्जिंग फीचर असलेल्या फोन किंवा चार्जरचा वापर करा जे 100% चार्ज झाल्यावर आपोआप चार्जिंग थांबवतात.
advertisement
7/7
काही महत्त्वाच्या टिप्सनेहमी ओरिजिनल चार्जर आणि केबल वापरा.फोन उशी खाली किंवा चादरीत ठेवून चार्ज करू नका.फोन खूप गरम होत असेल, तर ताबडतोब चार्जिंग बंद करा आणि सर्वात महत्त्वाचं रात्रीभर चार्जिंगला ठेवण्याची सवय सोडा आणि शक्यतो दिवसात फोन चार्ज करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
रात्रीभर फोन चार्जिंगला ठेवणाऱ्यांनो सावधान; ही सवय किती महाग पडू शकते माहितीय? एकदा हे वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल