Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमार-थायलंड बेचिराख, ब्रिटीशकालीन पूलही कोसळला, शहारे आणणारे 11 Photos
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
Myanmar Thailand Earthquake : म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. या दोन्ही देशांमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाने अवघ्या काही सेकंदांमध्ये इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. भूकंपाची दाहकता दाखवणारे फोटोही समोर आले आहेत.
advertisement
1/11

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या या तीव्र भूकंपाचे पडसाद भारतातही उमटले. भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मोठा विनाश झाला आहे. म्यानमारपासून ते बँकॉकपर्यंत अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. या विनाशकारी भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
advertisement
2/11
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार असल्याचं वैज्ञानिक संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. म्यानमारमध्ये एकदा नाही तर दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले, यामुळे नागरिकांनी रस्त्यावर येऊन मोठा आक्रोश केला.
advertisement
3/11
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 आणि 6.4 इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमधील मोन्यवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेला असलेल्या मंडाले येथे होते. या भूकंपाने थायलंडलाही हादरे बसले.
advertisement
4/11
म्यानमारमधील मंडाले येथील प्रसिद्ध ब्रिटीशकालीन अवा पूल भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे कोसळला. थायलंडमध्ये इमारतीखाली अनेक लोक अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली आणि दोन्ही देशांना मदत देऊ केली आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय अधिकाऱ्यांनाही तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
5/11
म्यानमारसोबतच थायलंडची राजधानी बँकॉकही भूकंपाने उद्ध्वस्त झालं आहे. बँकॉकमधील इमारतींमध्ये शेकडो लोक अडकले होते. भूकंपानंतर हजारो लोक ओरडत इमारतींबाहेर आले. भूकंपाचे केंद्र मंडाले शहराजवळ 10 किमी (६.२१ मैल) खोलीवर होते. म्यानमार हा जगातील भूकंपीयदृष्ट्या सर्वात सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे.
advertisement
6/11
शुक्रवारी दुपारी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 43 मजूर अडकल्याची माहिती आहे, पण या इमारतीतल्या जीवितहानीबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत आकडेवारी दिलेली नाही.
advertisement
7/11
भूकंपाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक बहुमजली इमारत अवघ्या काही सेंकदामध्ये जमीनदोस्त झाली आणि धुळीचे लोट पसरले. इमारत पडताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक ओरडत पळताना दिसत आहेत. भूकंपानंतर उंच छतांवर बांधलेल्या स्विमिंग पूलमधून पाणी वाहू लागले आणि अनेक इमारतींमधून कचरा पडू लागला.
advertisement
8/11
एकट्या बँकॉकमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील डझनभर इमारती अवघ्या काही सेकंदांमध्ये कोसळल्या आहेत. या भूकंपात शेकडो लोक बेपत्ता झाली आहेत, त्यामुळे सरकारने शोध मोहीम राबवायला सुरूवात केली आहे. तसंच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. भूकंपामुळे बँकॉकमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
9/11
म्यानमारमध्येही या भूकंपामुळे मोठा विनाश झाला आहे. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहेत. भूकंपानंतर सरकारने बचावकार्य सुरू केले आहे. म्यानमारमधील मंडाले आणि तौंगगी हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
10/11
भूकंपामुळे थायलंडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. ग्रेटर बँकॉक भागाची लोकसंख्या 1 कोटी 70 लाखांहून अधिक आहे, त्यापैकी बरेच जण उंच इमारतींमध्ये राहतात.
advertisement
11/11
भूकंपानंतरची शहरातली दृश्य पाहून लोक थरथर कापू लागले. ढिगाऱ्यांमधून मदतीसाठी ओरडण्याचे आवाज येत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी थायलंड आणि म्यानमारला मदतीचे आश्वासन दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमार-थायलंड बेचिराख, ब्रिटीशकालीन पूलही कोसळला, शहारे आणणारे 11 Photos