कार्यक्रमादरम्यान रिवाबा जडेजाने पती रवींद्र जडेजाचं इमानदारी आणि शिस्तीसाठी कौतुक केलं, पण हे बोलताना रिवाबाने इतर खेळाडूंवर निशाणा साधला. 'रवींद्र जडेजा लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांमध्ये खेळायला जातो, पण त्याला कधी चुकीच्या सवयी आणि व्यसन लागली नाहीत. टीमचे इतर खेळाडू परदेशात जाऊन चुकीचं काम करतात', रिवाबा जडेजाच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे, तसंच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधल्या संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
'जडेजालाही या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या, त्याला यासाठी मला विचारायचीही गरज नव्हती. पण त्याला स्वत:च्या जबाबदाऱ्या कळतात आणि तो कायमच शिस्त पाळतो', असं रिबावा जडेजा म्हणाली आहे. रिवाबा जडेजाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्य करण्याची रिवाबाची ही पहिलीच वेळ नाही, पण यावेळी रिवाबाने क्रिकेटपटूंविषयी वक्तव्य केल्यामुळे वाद झाला आहे.
जडेजा राजस्थानकडून खेळणार
आयपीएल 2026 मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. जडेजा मागच्या मोसमापर्यंत सीएसकेचा भाग होता, पण राजस्थान आणि सीएसके यांच्या संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात डील झाली. आयपीएलच्या पहिल्या मोसमात 2008 साली जडेजाने राजस्थानकडूनच पदार्पण केलं होतं आणि आता करिअरच्या उत्तरार्धात जडेजा पुन्हा एकदा राजस्थानकडूनच खेळताना दिसेल.
