Sunita Williams : चेहऱ्यावर हसू फुललं, पण हातपाय हलेना; पृथ्वीवर उतरताच कशी होती सुनीता विलियम्सची रिअॅक्शन? पाहा Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunita Williams first reaction : गेल्या 9 महिन्यांपासून ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. भारतीय वंशाची नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत.
advertisement
1/8

गेल्या 9 महिन्यांपासून ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. भारतीय वंशाची नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत.
advertisement
2/8
अमेरिकेचे अंतराळवीर बुच विल्मोर देखील त्यांच्यासोबत परतले आहे. नासा आणि स्पेस एक्सच्या मोहिमेला यशस्वी समारोप झाला आहे.
advertisement
3/8
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वीरित्या उतरले. स्पेसएक्स क्रू-९ दोन्ही अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले.
advertisement
4/8
अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्याचा प्रवास 17 तासांचा होता. त्यामुळे सर्वांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. पण विलियम्स यांचं बुलेट कॅपसुल यशस्वीरित्या माघारी आलं.
advertisement
5/8
बुलेट कॅप्सुलमधून बाहेर येताच सुनीता विलियम्स यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. अमेरिकन नेव्हीला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना झाला होता.
advertisement
6/8
कॅमेऱ्यासमोर त्यांनी प्रेक्षकांना अभिवादन केलं. पण सुनीता विलियम्स यांचे हातपाय हालत नव्हते. त्यामुळे त्यांना सुरक्षितरित्या नेण्यात आलं.
advertisement
7/8
अंतराळवीर कॅप्सूलमधून बाहेर आले तेव्हा त्यांना स्ट्रेचरवरून नेण्यात आलं. अंतराळवीरांना आरामात जुळवून घेता यावं म्हणून दीर्घकाळ अंतराळात राहणाऱ्यांसाठी ही एक सामान्य प्रक्रिया असते.
advertisement
8/8
दरम्यान, कॅप्सूलभोवती किमान पाच डॉल्फिन फिरत होते, जणू काही ते त्यांच्या पद्धतीने अंतराळवीरांचे स्वागत करत होते. हा क्षण ऐतिहासिक होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Sunita Williams : चेहऱ्यावर हसू फुललं, पण हातपाय हलेना; पृथ्वीवर उतरताच कशी होती सुनीता विलियम्सची रिअॅक्शन? पाहा Photos