Sunita Williams : सुनीता विलियम्स यांना माहिती होतं संकट येणार, 'या' देवाची मुर्ती घेऊन अंतराळात गेल्या होत्या
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunita Williams faith in lord Ganesha : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 286 दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले.
advertisement
1/7

59 वर्षांच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams Age) आणि बुच विल्मोर यांच्या बुलेट कॅप्सुलच्या लँडिंगसह नासाच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचा शेवट झाला. त्यामुळे आता अमेरिकेसह भारतात देखील जल्लोष पहायला मिळत आहे.
advertisement
2/7
न्यूज 18 शी बोलताना फाल्गुनी पांड्या यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्सने गणेशाची मूर्ती तिच्यासोबत आयएसएस म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेली होती.
advertisement
3/7
सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिन्यांहून अधिक काळ घालवला. आता त्या सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर आणि इतर दोन क्रू सदस्यांसह पृथ्वीवर परतल्या आहेत.
advertisement
4/7
फाल्गुनी पंड्याने त्याची चुलत बहीण सुनीता विलियम्सच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला. ती परतल्यावर कुटुंबाने मंदिरात विशेष प्रार्थना आणि हवन करण्याची योजना आखली आहे.
advertisement
5/7
सुनीता विलियम्स गुजरातची मुलगी आहे. तिला भारतीय जेवण खूप आवडतं, ती परतल्यानंतर आपण पुन्हा भारतात येऊ, असं फाल्गुनी पंड्याने म्हटलं आहे.
advertisement
6/7
आम्ही कुंभमेळाव्याला गेलो होतो, तेव्हा आम्ही सुनीताला फोटो दाखवले होते. त्यावेळी तिच्या मनात कुंभमेळ्याविषयी उत्सुकता होती, असंही फाल्गुनी पंड्याने म्हटलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तासांचे संशोधन पूर्ण केले. त्यांनी 150 हून अधिक प्रयोग केले आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांना माहिती होतं संकट येणार, 'या' देवाची मुर्ती घेऊन अंतराळात गेल्या होत्या