TRENDING:

PHOTO: पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या इमारती, रस्ते दुभंगले, डोळ्यादेखत मृत्यूचं तांडव

Last Updated:
थायलँड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये 7.7 आणि 7.9 तीव्रतेचा भूकंप आला. म्यानमारमध्ये १२ वाजता धक्के जाणवले. बँकॉकमध्ये इमारत कोसळून ४३ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 100 हून जास्त मृत्यू.
advertisement
1/6
पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती, रस्ते दुभंगले, डोळ्यादेखत मृत्यूचं तांडव
ईदच्या आधी मोठी दुर्घटना घडली आहे. थायलँड, म्यानमार आणि बँकॉकमध्ये मोठा भूकंप आला आहे. 7.7 आणि 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धोकादायक धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.७ होती.
advertisement
2/6
भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की त्याचे धक्के बँकॉकपासून दिल्लीपर्यंत जाणवले. त्याचे धक्के शेजारील देश बांगलादेश, चीन, लाओस आणि थायलंड आणि भारतात जाणवले. घरातील खिडक्या, पंखे ते ट्यूबलाईटपर्यंत सर्व काही थरथरू लागले.
advertisement
3/6
म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी बहुमजली इमारती कोसळल्याचे, पूल कोसळल्याचे आणि ढिगाऱ्याखाली लोक गाडल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम थायलंडमध्ये दिसून येतो. - फोटो सौजन्य AFP
advertisement
4/6
मोठ्या इमारती कोसळत असल्याचे अनेक व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. बँकॉकमध्ये एका बहुमजली इमारत कोसळल्यानंतर ४३ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. फोटो सौजन्य - AFP
advertisement
5/6
जीव मुठीत घेऊन लोक घराबाहेर आले. रस्त्यांवर गाड्या हलायला लागल्या. काही भागांमध्ये रस्ते दुभंगले. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 100 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
6/6
अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाचे धक्के भारतातही काही जिल्ह्यांमध्ये बसले. नोएडा, दिल्ली, गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
PHOTO: पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या इमारती, रस्ते दुभंगले, डोळ्यादेखत मृत्यूचं तांडव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल