TRENDING:

136 कोटी रुपयांचं इनाम, पावलो एस्कोबारपेक्षाही खतरनाक, कोण होता एल मांचो, का पेटलं मेक्सिको?

Last Updated:
एल मांचो या कुख्यात ड्रग्स माफियाचा मेक्सिकोमध्ये लष्करी कारवाईत एन्काउंटर झाला, त्यानंतर देशभर हिंसाचार वाढला आणि भारतीय दूतावासाने तातडीची अॅडव्हायझरी जारी केली.
advertisement
1/8
136 कोटी रुपयांचं इनाम, पावलो एस्कोबारपेक्षाही खतरनाक, कोण होता एल मांचो?
जगभरात पावलो एस्कोबारनंतर ज्याची चर्चा झाली आणि त्याला पाहून धडकी भरायची असा कुख्यात ड्रग्स माफिया एल मांचो याचा लष्करी कारवाई दरम्यान एन्काउंटर करण्यात आला. ज्याच्या एका इशाऱ्यावर मेक्सिकोच्या रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहायचे, तो नेमेसियो एल मेंचो ओसेगुएरा सर्वांतेस ठार मारला गेला. - AFP
advertisement
2/8
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मेक्सिकोतल्या रस्त्यांवर प्रचंड हिंसाचार सुरू झाला. दिसेल त्याला गोळ्या घालण्याचे आदेश एल मांचोच्या संघटनेनं दिले. तर घरं, दुकानं गाड्या पेटवून देण्यात आल्या. कुख्यात ड्रग्स माफिया एल मांचोच्या अटकेवर अमेरिकेने १३६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवलं होतं. पण त्याच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण मेक्सिकोमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. AFP
advertisement
3/8
जगाला 'नार्को वॉर'ची ओळख करून देणारा कोलंबियाचा पावलो एस्कोबार आठवतो? एल मेंचो हा त्याच्यापेक्षाही अधिक खतरनाक मानला जायचा. मेंचो एकेकाळी पोलीस होता, पण नंतर त्याने जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (CJNG) ही जगातील सर्वात हिंसक संघटना उभी केली. AFP
advertisement
4/8
एस्कोबारकडे टोळ्या होत्या, पण मेंचोकडे स्वतःचं सैन्य होतं. त्याच्याकडे रॉकेट लाँचर, लष्करी हेलिकॉप्टर पाडण्याची ताकद आणि अत्याधुनिक ड्रोन बॉम्ब होते. एस्कोबार अमली पदार्थांच्या व्यापारात होता, पण मेंचोने जगभरात फेंटानिल या जीवघेण्या ड्रॅगचे जाळे विणले होते, ज्यामुळे अमेरिकेत लाखो तरुण मृत्युमुखी पडले. AFP
advertisement
5/8
मेक्सिकोच्या जलिस्को राज्यातील टापालपा भागात लष्कराने मेंचोला घेराव घातला. भीषण चकमकीत मेंचो आणि त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले. त्याला उपचारासाठी मेक्सिको सिटीला विमानाने नेले जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून मॅक्सिकोवर जो दबाव आणला होता, त्याचाच हा परिणाम मानला जात आहे. AFP
advertisement
6/8
मेंचोच्या खात्म्याची बातमी येताच त्याच्या टोळीने संपूर्ण देशात तांडव सुरू केलं आहे. मेक्सिकोमधील ५ हून अधिक राज्यांमध्ये रस्ते अडवून बस, ट्रक आणि पेट्रोल पंप पेटवून दिले आहेत. विमानतळावर गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याने 'एअर कॅनडा'सह अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. AFP
advertisement
7/8
अनेक शहरे पूर्णपणे बंद झाली असून लोक जीवाच्या भीतीने घरात लपून बसले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारत सरकारने मेक्सिकोमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची 'अॅडव्हायझरी' जारी केली आहे. AFP
advertisement
8/8
भारतीय दूतावासाने भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः जलिस्को, मिचोआकान आणि गुरेरो या राज्यांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. मदतीसाठी दूतावासाने +52 55 4847 7539 हा क्रमांक दिला आहे. AFP
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
136 कोटी रुपयांचं इनाम, पावलो एस्कोबारपेक्षाही खतरनाक, कोण होता एल मांचो, का पेटलं मेक्सिको?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल