अजब प्रकरण! अवयवदान करणारे मृत पुन्हा झाले 'जिवंत'; ज्या रुग्णांना दिले अवयव त्यांच्यासोबत...
- Published by:Priya Lad
Last Updated:
अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/5

अवयवदान केल्यानंतर मृत व्यक्ती अवयवरूपी जिवंत राहते असं म्हणतात. पण आता हे खरंच ठरताना दिसत आहे. ज्या रुग्णांना मृतांचे अवयवदान करण्यात आलेत, त्या रुग्णांसोबत विचित्र प्रकार घडताना दिसतो आहे. या रुग्णांचं वागणंच बदललं आहे.
advertisement
2/5
ट्रान्सप्लांटोलॉजी या मेडिकल जर्नलमध्ये पर्सनॅलिटी चेंजेस असोसिएटेड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणून हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात अवयव प्रत्यारोपण झालेल्या बदलांबाबत सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/5
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. यात अवयव प्रत्यारोपण झालेल्या 47 लोकांचा समावेश होता. त्यांचं ऑनलाईन सर्व्हेक्षण करण्यात आलं. 47 लोकांपैकी 23 जणांना हार्ट मिळालं होतं तर इतर अवयव मिळालेले 24 लोक होते.
advertisement
4/5
सर्व प्रत्यारोपण झालेल्या लोकांपैकी 89 टक्के लोकांनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचं व्यक्तिमत्त्व बदलल्याचे सांगितलं. खाणं-पिणं, आवडी-निवडी, सवयी यात बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
5/5
काही रुग्णांनी सांगितलं, त्यांना अशी काही स्वप्नं पडतात, अशा काही गोष्टी आठवतात ज्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. पण ही स्वप्नं आणि आठवणी ज्या व्यक्तीचे अवयव त्यांच्या शरीरात होते, त्यांच्याशी संबंधित आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अजब प्रकरण! अवयवदान करणारे मृत पुन्हा झाले 'जिवंत'; ज्या रुग्णांना दिले अवयव त्यांच्यासोबत...