Ahmedabad Plane Crash : विमानातील सगळ्यात सुरक्षित सीट, इथं बसल्याने अपघातातही वाचू शकतो जीव
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आता कित्येक लोकांना विमान प्रवासाची भीती वाटत असेल. पण विमानातील एक अशी सीट जिथं बसल्याने अपघातातही जीव वाचण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
1/5

विमानातील सर्वात सुरक्षित जागा कोणती यावर संशोधन केलं. 2012 साली मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी एक विमान जाणूनबुजून पाडलं. जिथं क्रॅश टेस्ट डमी आणि इतर वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज बोइंग 727-200 जमिनीवर कोसळलं.
advertisement
2/5
वाळवंटात कोसळलेल्या या बोईंग 727 विमानातील नेमक्या कोणत्या भागाचं सर्वाधिक नुकसान झालं, कोणत्या भागाचं मध्यम स्वरूपात नुकसान झालं आणि कोणत्या भागाचं कमी नुकसान झालं, याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला.
advertisement
3/5
अभ्यासाअंती या प्रयोगाचा निष्कर्ष असा नोंदवला गेला की, विमान कोसळल्यास त्याच्या पुढच्या भागात बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. शिवाय पंखांशेजारी बसलेल्या प्रवाशांचा जीवही धोक्यात असतो. मात्र विमानाच्या कोणत्याही अपघातातून मागच्या बाजूच्या किंवा शेवटच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता इतर प्रवाशांच्या तुलनेत सर्वाधिक असते.
advertisement
4/5
टाइम मॅगझिनने 2015 वर्षापर्यंत 35 वर्षांच्या अपघात डेटाचं विश्लेषण केलं. विमान अपघातात पाठीमागे बसलेल्या कमी लोकांचा मृत्यू झाल्याचं अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. अभ्यासानुसार, विमानाच्या मागील भागात असलेल्या सीट्समध्ये मृत्यूचं प्रमाण 32 टक्के होते, तर मध्यभागी 39 टक्के आणि पुढच्या तिसऱ्या भागात 38 टक्के होतं.
advertisement
5/5
एकंदर काय तर विमानातील मागच्या बाजूची सीट सर्वात सुरक्षित असते. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा जेव्हा विमान प्रवास कराल, तेव्हा मागच्या बाजूची सीट निवडण्यास प्राधान्य द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ahmedabad Plane Crash : विमानातील सगळ्यात सुरक्षित सीट, इथं बसल्याने अपघातातही वाचू शकतो जीव