ATM Card Charges : ATM कार्डवर प्रत्येक वर्षी किती लागतो चार्ज? 'हे' 5 बेसिक नियम प्रत्येकाला माहित असायलाच हवेत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ATM च्या मदतीने आपण केवळ बँकेच्या शाखेत न जाता थेट ATM मशीनमधून रोख पैसे काढू शकतो, ऑनलाइन पेमेंट करू शकतो, खाते तपासू शकतो, आणि अनेक व्यवहार सहज पार पाडू शकतो.
advertisement
1/9

ATM कार्ड हे आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकाकडे आहे. म्हणजे जितक्या ही लोकांचं बँकेत खातं आहे, त्या प्रत्येकाकडे एटीएक कार्ड आहे. मग एका व्यक्तीचे चार बँक अकाउंट असले तरी प्रत्येक अकाउंचं एटीएम कार्ड असतं.
advertisement
2/9
याच्या मदतीने आपण केवळ बँकेच्या शाखेत न जाता थेट ATM मशीनमधून रोख पैसे काढू शकतो, ऑनलाइन पेमेंट करू शकतो, खाते तपासू शकतो, आणि अनेक व्यवहार सहज पार पाडू शकतो. पण हल्ली ऑनलाइन पेमेंट आणि युपीआय यांसारखे प्रकार आल्यानंतर लोकांनी आता एटीएम वापरणं पण सोडून दिलं आहे. कधी मोठी रक्कम काढायची असली तरच लोक एटीएस वापरतात.
advertisement
3/9
पण असं असलं तरी देखील बँकेकडून एटीएमचे पैसे कापले कापले जातात. कारण एटीएमच्या सुविधांसोबत काही खर्च आणि अटी देखील जोडलेल्या असतात, ज्याबाबत अनेकांना नीट माहिती नसते.
advertisement
4/9
चला तर मग जाणून घेऊया ATM कार्डशी संबंधित अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टी –
advertisement
5/9
1. दरवर्षी ATM कार्डसाठी शुल्क आकारलं जातंATM कार्ड हे फुकट नसतं. बऱ्याचशा बँका आपल्या ग्राहकांकडून दरवर्षी एक वार्षिक देखभाल शुल्क (Annual Maintenance Charge - AMC) वसूल करतात. हे शुल्क कार्डच्या प्रकारावर आणि मिळणाऱ्या सेवा-सुविधांवर अवलंबून असतं. काही बेसिक कार्ड्सवर हे शुल्क शून्य असतं, पण काही प्रीमियम कार्ड्ससाठी हे AMC 2000 रुपयेपर्यंत जाऊ शकतं. याशिवाय यावर 18% GST वेगळा लागू होतो.
advertisement
6/9
2. वारंवार पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क लागूबहुतेक बँका ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी मासिक मर्यादा ठेवतात. उदाहरणार्थ महिन्याला 3 ते 5 मोफत व्यवहार. ही मर्यादा ओलांडल्यास प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 10 ते 25 रुपये पर्यंतचे शुल्क आकारले जाऊ शकते.
advertisement
7/9
3. ATM कार्डवर शुल्क का घेतलं जातं?ATM कार्ड हे केवळ पैसे काढण्यासाठी नसून, SMS अलर्ट्स, ऑनलाइन व्यवहार, ईमेल नोटिफिकेशन्स, शिल्लक तपासणी अशा अनेक सेवांसाठी वापरले जाते. या सेवा सुरु ठेवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी बँका AMC आणि GST चार्ज करतात.
advertisement
8/9
4. बिनशुल्क ATM कार्डही उपलब्ध असतातकाही बँका बेसिक डेबिट कार्ड देतात, ज्यावर कोणतेही वार्षिक शुल्क लागत नाही. मात्र हे कार्ड केवळ रोख रक्कम काढण्यासाठी वापरण्यात येते आणि त्यावर मर्यादित सुविधा असतात. बँका हे कार्ड फारसे प्रमोट करत नाहीत, त्यामुळे अशा कार्डसाठी तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन विचारणा करावी लागते.
advertisement
9/9
5. वापर केला नाही, तरी शुल्क लागू होतोजर तुम्ही ATM कार्ड घेतलं असेल आणि त्याचा वापर करत नसाल, तरीही त्यावर AMC आणि GST लागू होतो. कारण हे शुल्क कार्ड अॅक्टिव्ह असतानाच लागू होतं. त्यामुळे जर तुम्हाला कार्ड वापरायचं नसेल, तर ते रद्द करून टाकणं किंवा बिनशुल्क बेसिक कार्ड निवडणं फायदेशीर ठरू शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ATM Card Charges : ATM कार्डवर प्रत्येक वर्षी किती लागतो चार्ज? 'हे' 5 बेसिक नियम प्रत्येकाला माहित असायलाच हवेत