काय! या वर्षी जगाचा अंत? 2025 सालाबाबत बाबा वेंगांची भयानक भविष्यवाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baba Vanga prediction : बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची वयाच्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. असं म्हणतात की तिची दृष्टी गमावल्यानंतर, तिला भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली, त्यानंतर तिने भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली. 2025 साठी त्यांनी काय भाकित केले ते जाणून घ्या.
advertisement
1/7

प्रत्येकाला भविष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, परंतु पुढे काय होईल हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी जगात असे अनेक भविष्य सांगणारे आहेत ज्यांचे दावे वेळोवेळी खरे ठरले आहेत. यापैकी एक बाबा वेंगा. बाबा वेंगा यांनी वेगवेगळ्या वर्षांत घडणाऱ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनांचा अंदाज बांधला होता.
advertisement
2/7
बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची वयाच्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. त्यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली, त्यानंतर तिने भविष्यवाणी करण्यास सुरुवात केली. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रत्येक वर्षाच्या घटनांचं भाकीत केलं आणि लिहून ठेवलं. त्यांचे अनेक भाकीतही खरे ठरले आहेत.
advertisement
3/7
सत्यात उतरलेल्या गोष्टींमुळे त्याच्या भाकितांवर जगातील अनेकांचा विश्वास वाढला आहे. आता 2025 वर्ष सुरू झालं आहे. कित्येक वर्ष आधीच बाबा वेंगा यांनी 2025 वर्षात काय घडणार ते सांगितलं होतं.
advertisement
4/7
बाबा वेंगा यांनी 2025 साठी जे काही भाकीत केले आहेत ते शुभ नाहीत. 2025 मध्ये जगाचा अंत होईल, असा दावा त्यांनी केला होता. 2012 मध्येही जगाचा अंत होईल असं भाकीत केलं होतं, पण तसं झालं नाही. तथापि, बाबा वेंगाच्या मते, सन 5079 मध्ये पृथ्वीवरून मानवतेचा अंत होईल.
advertisement
5/7
बाबा वांगाच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये जगाला मोठं युद्ध आणि संघर्ष दिसेल. युरोपमध्ये युद्ध सुरू होऊ शकतं. या युद्धात युरोपीय देशांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
advertisement
6/7
2025 च्या संघर्षामुळे जगाची लोकसंख्या लक्षणीय घटेल. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, विनाश इतका मोठा असेल की मानवांना जगण्यासाठी नवीन संसाधनांचा शोध घ्यावा लागेल. 2025 नंतरचे भाकीतही खूप भीतीदायक आणि धक्कादायक आहेत. 2028 मध्ये मानव शुक्रावर पोहोचू शकतो. याशिवाय 2033 मध्ये बर्फाचा एक मोठा तुकडा वितळणार असून त्यामुळे समुद्राची पातळी लक्षणीय वाढेल असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. यामुळे सुनामी येईल आणि लोक बुडतील.
advertisement
7/7
बाबा वेंगा यांनी देखील 2130 मध्ये एलियन आणि मानव यांच्यात संपर्क प्रस्थापित होण्याची भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते की, हवामान बदलामुळे 2170 पर्यंत पृथ्वीवर हाहाकार माजवेल. पृथ्वीवर दुष्काळ पसरेल आणि मानवी जीवन उद्ध्वस्त होऊ लागेल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर 3005 मध्ये पृथ्वी आणि मंगळावर स्थलांतरित झालेल्या मानवांमध्ये युद्ध होईल. 5079 मध्ये जगाचा पूर्ण अंत होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला कारण तेव्हाच मानवजातीचा पूर्णपणे नाश होईल.