TRENDING:

Cricket : अम्पायर कसं बनतात? त्यासाठी किती शिक्षण लागतं आणि कमाई किती? जाणून घ्या A टू Z माहिती

Last Updated:

तुम्ही कधी विचार केलाय का की, कोट्यवधींच्या या खेळात अम्पायर कसं बनतात? यासाठी काय पात्रता लागते? चला तर मग, 'करिअर कनेक्ट'च्या आजच्या भागात अम्पायरिंगच्या जगातील रंजक प्रवास जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा एखादा फलंदाज षटकार मारतो किंवा गोलंदाज विकेट घेतो, तेव्हा अख्खं स्टेडियम जल्लोष करतं. पण या जल्लोषाच्या आणि दबावाच्या वातावरणात दोन व्यक्ती अशा असतात, ज्यांना शांत राहून प्रत्येक चेंडूवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. ते म्हणजे 'क्रिकेट अम्पायर'.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अम्पायरचा एक चुकीचा निर्णय पूर्ण मॅचचा निकाल बदलू शकतो. त्यामुळेच क्रिकेटमध्ये खेळाडूं इतकेच महत्त्व अम्पायरलाही असते. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की, कोट्यवधींच्या या खेळात अम्पायर कसं बनतात? यासाठी काय पात्रता लागते? चला तर मग, 'करिअर कनेक्ट'च्या आजच्या भागात अम्पायरिंगच्या जगातील रंजक प्रवास जाणून घेऊया.

शिक्षण की कौशल्य? नेमकी पात्रता काय?

advertisement

अम्पायर बनण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्स शिकण्याची गरज नाही. अम्पायर होण्यासाठी कोणत्याही विशेष पदवीची (Degree) अट नाही. तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असा किंवा अगदी 12 वी पास असाल तरी चालेल.

महत्त्वाची अट म्हणजे तुम्हाला क्रिकेटच्या नियमांची (Laws of Cricket) सखोल माहिती असणे आवश्यक आहे.

मैदानात कडक उन्हात सलग 7-8 तास उभं राहावं लागतं, त्यामुळे तुमची फिजिकल फिटनेस उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे.

advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर अम्पायरिंग करायची असेल, तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे, कारण क्रिकेटची संवादाची मुख्य भाषा इंग्रजीच आहे.

बीसीसीआयचे माजी अम्पायर एस. के. बन्सल यांच्या मते, जर तुम्ही स्वतः क्रिकेट खेळलेले असाल, तर तुम्हाला अम्पायरिंगमध्ये त्याचा मोठा फायदा होतो.

अम्पायर बनण्याची पायरी: स्टेट असोसिएशनपासून सुरुवात

अम्पायर बनण्याचा प्रवास थेट आयसीसी (ICC) पासून सुरू होत नाही, तर तो तुमच्या स्थानिक क्रिकेट बोर्डापासून सुरू होतो.

advertisement

1. नोंदणी (Registration): तुमचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही तुमच्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये (उदा. MCA - मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा Maharashtra Cricket Association) नोंदणी करू शकता.

2. स्थानिक सामने: सुरुवातीला तुम्हाला स्थानिक लीग सामने आणि क्लब मॅचेसमध्ये अम्पायरिंग करण्याची संधी मिळते. इथे तुम्हाला वरिष्ठ अम्पायर्सकडून बारकावे शिकायला मिळतात.

advertisement

3. राज्यस्तरीय परीक्षा: जेव्हा राज्याची क्रिकेट असोसिएशन पॅनेल तयार करते, तेव्हा ते एक परीक्षा घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुमची निवड राज्यस्तरीय अम्पायर म्हणून होते.

BCCI कडे जाणारा रस्ता

राज्याच्या स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर, तुमची नावे BCCI कडे पाठवली जातात.

बीसीसीआय अम्पायर्ससाठी लेखी (Theory), प्रात्यक्षिक (Practical) आणि तोंडी (Viva) परीक्षा घेते.

कठोर निवड: पुढे जाण्यासाठी या तिन्ही परीक्षांमध्ये मिळून किमान 90 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.

सुरुवातीला तुम्हाला ज्युनियर सामने (Under-15, Under-19) दिले जातात. अनुभवानुसार तुमची बढती रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी आणि शेवटी IPL व आंतरराष्ट्रीय सामन्यांकडे होते. हा प्रवास साधारण 5 ते 6 वर्षांचा असू शकतो.

कमाई आणि संधी किती?

अम्पायरिंग हे आता केवळ छंदापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हे एक अतिशय प्रतिष्ठेचे आणि भरघोस पगाराचे करिअर बनले आहे.

बीसीसीआय अम्पायर्स: बीसीसीआयच्या पॅनेलमध्ये साधारण 150 अम्पायर्स असतात.

IPL आणि आंतरराष्ट्रीय कमाई

एका आयपीएल मॅचसाठी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अम्पायर्सना लाखांमध्ये मानधन मिळते. याशिवाय प्रवास आणि राहण्याचा खर्च बोर्डाकडून केला जातो.

जर तुम्ही आयसीसीच्या 'एलिट पॅनेल'मध्ये स्थान मिळवले, तर वार्षिक उत्पन्न कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते.

थोडक्यात महत्त्वाचे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं ठिकाण, 40 दिवस चालते यात्रा, हंडी मटण खाण्यासाठी असते गर्दी
सर्व पहा

अम्पायर बनणे ही केवळ नियमांची पोपटपंची नाही, तर ते निर्णयक्षमतेचे कसब आहे. जर तुम्हाला क्रिकेटची आवड असेल आणि तुमच्यात प्रचंड संयम असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket : अम्पायर कसं बनतात? त्यासाठी किती शिक्षण लागतं आणि कमाई किती? जाणून घ्या A टू Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल