TRENDING:

अडीच फुटाच्या संध्याचा 5.5 फुटाच्या प्रभातवर आला जीव, 8 वर्षे चाललं अफेअर, पण आईने दिला नकार, शेवटी असं झालं लग्न

Last Updated:
जबलपूरमधील एक लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याठिकाणी अडीच फूट उंचीच्या वधूने साडेपाच फूट उंचीच्या मुलाशी लग्न केले. दोघेही आधी शेजारी होते. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शेवटी आठ वर्षांनी यांनी लग्न केले. पण, इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेयसीला मोठा संघर्ष करावा लागला. (भारत तिवारी, प्रतिनिधी, जबलपुर)
advertisement
1/5
अडीच फुटाची नवरी तर 5.5 फुटाचा नवरदेव, शेजारीच राहायचे, 8 वर्ष चाललं अफेअर
असे म्हणतात, लग्न हे योग जुळल्यावरच होते. असाच एक योग मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील घाना येथे जुळला. याठिकाणी एका अडीच फुटाच्या मुलीने 5.5 फुटाच्या तरुणाशी लग्न केले. 8 वर्षे दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आता त्यांचे लग्न झाले आहे.
advertisement
2/5
जबलपुरच्या घाना येथील रहिवासी असेलली संध्या हिची उंची अडीच फूट आहे. तिचे लग्न 5.5 उंची असलेल्या तिचा प्रियकर प्रभातसोबत झाले. विशेष म्हणजे दोन्ही एकाच परिसरात राहायचे. जबलपुर येथील एका समाज सेवा संगटनेच्या माध्यमातून हे लग्न यशस्वीपणे पार पडले.
advertisement
3/5
जबलपुर येथील हनुमानताल क्षेत्रात स्थित असलेल्या शिव मंदिरात धुमधडाक्यात हे लग्न पार पडले. या लग्नाला प्रभातच्या कुटुंबीयांचा होकार होता. मात्र, संध्याच्या आईने नकार दिला होता.
advertisement
4/5
प्रभात आणि संध्या शेजारी होते. 8 वर्षांपूर्वी दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नंतर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. संध्या आणि प्रभात यानंतर अनेकदा सोबतच फिरू लागले. काहीजण त्यांची खिल्लीही उडवायचे. मात्र, दोघांना काहीही फरक पडत नव्हता. त्यानंतर प्रभातला रीवा येथील एका कंपनीत नोकरी मिळाली. तसेच संध्या एक नृत्यांगना आहे. ती विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करते.
advertisement
5/5
संध्या ने जव्हा प्रभात सोबत लग्न करण्याबाबत आपल्या आईला सांगितले तेव्हा आधी तिच्या आईने होकार दिला. मात्र, नंतर नकार दिला. तेव्हा संध्याने लग्नासाठी हट्ट केला असता आईने घरातून तिला बाहेर काढून टाकले. शेवटी तिने जबलपूर येथील बीएचसीएचआय संस्थेकडे धाव घेतली. या संस्थेने तिला फक्त राहायला जागाच दिली नाही प्रभातसोबत लग्नाचे आश्वसनही दिले. प्रभातच्या घरची लोकं या लग्नाला तयार होती. त्यामुळे संस्था ही संध्याचे कुटुंब बनली आणि धुमधडाक्यात हे लग्न पार पडले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अडीच फुटाच्या संध्याचा 5.5 फुटाच्या प्रभातवर आला जीव, 8 वर्षे चाललं अफेअर, पण आईने दिला नकार, शेवटी असं झालं लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल