TRENDING:

Aacharya Chanakya : आचार्य चाणक्य यांचं शिक्षण कुठे झालं होतं?

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती अनेक जण फॉलो करतात. ज्यात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर धडे दिले आहेत. पण आचार्य चाणक्य किती आणि कुठे शिकले माहिती आहे का?
advertisement
1/7
Aacharya Chanakya : आचार्य चाणक्य यांचं शिक्षण कुठे झालं होतं?
आज किती तरी लोक आचार्य चाणक्य यांची चाणक्यनीती फॉलो करतात. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीत तुम्हाला त्यांची वेगवेगळ्या विषयाची किंवा क्षेत्राची धोरणं पाहायला मिळतील. त्यांनी रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. यात 25 प्रकरणं आणि सहा हजार श्लोक आहेत.
advertisement
2/7
हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात असलेल्या धोरणास चाणक्यनीती किंवा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे.
advertisement
3/7
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीत शिक्षणाचंही महत्त्व समजावून सांगितलं आहे. शिक्षणाचं महत्त्व सांगणारे आणि सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलेले आचार्य किती शिकले असतील याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
4/7
आचार्य चाणक्य यांचं शिक्षण तक्षशिला येथील विद्यापीठात पूर्ण झालं.  तक्षशिला हे सगळ्यात प्राचीन विश्वविद्यालयांपैकी एक. प्राचीन भारतातील गांधार प्रदेशच्या राजधानीत होतं. आज हे पाकिस्तानातील इस्लामाबादजवळील रावलपिंडी जिल्ह्यात आहे.
advertisement
5/7
व्यापार, ज्ञान आणि कलेचं एक प्रमुख केंद्र होतं. जिथं जवळपास 64 विषयांचे धडे दिले जायचे. यात वेद, गणित, अर्थशास्त्र, युद्ध विद्या आणि आयुर्वेदाचाही समावेश होता. हे फक्त ज्ञानच नाही तर व्यापाराचंही एक मोठं केंद्र होतं.
advertisement
6/7
आचार्य चाणक्य नंतर याच विद्यापीठातच शिक्षक होते. ते राजकारण आणि अर्थशास्त्र शिकवायचे. या विषयांवर अध्यापन चालू केलं आणि अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून त्यांंनी आपली ओळख निर्माण केली.
advertisement
7/7
सूचना : हा लेख इंटरनेटवर उपलब्ध सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पुष्टी केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Aacharya Chanakya : आचार्य चाणक्य यांचं शिक्षण कुठे झालं होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल