Mobile Interesting Facts : मोबाईल बंद करून चार्जिंग केल्यावर फोन जास्त वेगाने चार्ज होतो का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Interesting Facts : मोबाईल फोन बंद करून चार्जिंग केल्याने फोन लवकर चार्ज होतो असं म्हणतात. खरंच असं होतं का? यामागे काय लॉजिक आहे? याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.
advertisement
1/7

बरेच लोक मोबाईल फोन बंद करून चार्ज करतात. यामुळे फास्ट चार्जिंग होते. कमी वेळात फोन चार्ज होतो असं म्हणतात. पण खरंच असं होतं का? मोबाईल बंद केल्याने जास्त वेगाने चार्जिंग होते का? तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे.
advertisement
2/7
फोन चालू असताना बॅकग्राऊंडमध्ये खूप गोष्टी सुरू असतात. त्यामुळे तुम्ही फोन वापरत नसला, तो तुमच्या हातात नसला तरी या सगळ्या गोष्टी बॅटरी वापरत असतात. म्हणजे चार्जिंग होते आणि सोबत बॅटरी खर्चही होत असते.
advertisement
3/7
फोन बंद करून चार्ज केल्यावर नेटवर्क बंद होतं, बॅकग्राऊंड एप्स बंद होतात. प्रोसेसर, रॅम इनएक्टिव्ह होतात, स्क्रिन वापरात नसते. त्यामुळे बॅटरी खर्च जवळजवळ शून्य होतो. चार्जरकडून येणारी सगळी ऊर्जा थेट बॅटरीमध्ये साठवली जाते.
advertisement
4/7
पण फोन बंद करून चार्ज केल्यावर चार्जिंग वेगवान होते. पण खूपच वेगाने होते असं नाही. साधारणतः 5% ते 15% पर्यंतच फरक पडतो.
advertisement
5/7
फास्ट चार्जिंग असलेल्या फोनमध्ये हा फरक आणखी कमी दिसतो, तर जुन्या किंवा स्लो चार्जिंग फोनमध्ये फरक थोडा जास्त दिसतो. म्हणजेच फोन बंद करून चार्ज केल्याने थोडा फायदा होतो, पण तो चमत्कारिक नाही.
advertisement
6/7
फास्ट चार्जिंगमध्ये सुरुवातीचे 50–60% चार्ज खूप वेगाने होतो. पण फोन बंद असो वा सुरू ¬80% नंतर बॅटरी सेफ्टीसाठी चार्जिंग आपोआप स्लो होते. म्हणून फास्ट चार्जिंगमध्ये पॉवर ऑफ चार्जिंगचा फार मोठा फायदा दिसत नाही.
advertisement
7/7
फोन बंद करून चार्ज केल्याने बॅटरीवर ताण कमी येतो, फोन गरम होण्याची शक्यता कमी होते, चार्जिंग थोडी जलद होते, बॅटरी हेल्थसाठी चांगलं आहे. फोन खूप गरम होत असेल, बॅटरी खूप लवकर संपत असेल, जुना फोन असेल अशावेळी फोन बंद करून चार्ज करणं फायदेशीर ठरतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : मोबाईल बंद करून चार्जिंग केल्यावर फोन जास्त वेगाने चार्ज होतो का?