Honeymoon Hotel : हनीमूनसाठी हॉटेलमध्ये थांबलात; हॉटेल रूममधील या 5 वस्तूंना चुकूनही हात लावू नये
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honeymoon Hotel Never Touch Things : हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं योग्य नाही. अशा काही वस्तू ज्यांना चुकूनही हात लावू नये, आता हनीमूनसाठी हॉटेलमध्ये जाणाऱ्या कपल्सने तर हे लक्षात ठेवायलाच हवं.
advertisement
1/7

नवविवाहित जोडपी आता हनीमूनला जात आहे. काही जण हनीमूनवर असतील तर काही जण हनीमूनच्या तयारीत असतील. हनीमून म्हणजे हॉटेल आलंच. पण हॉटेलमध्ये राहताना कपल्सने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यापैकी एक म्हणजे हॉटेलमधील अशा काही वस्तू ज्यांना कपल्सने चुकूनही हात लावू नये.
advertisement
2/7
ब्लँकेट : एका रिपोर्टनुसार हॉटेलमधील ब्लँकेट वर्षातून फक्त चार वेळा बदलल्या जातात. या काळात किती लोक त्यावर झोपले असतील, त्यांनी काय काय केलं असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुमचं ब्लँकेट सोबत न्या.
advertisement
3/7
उशीचं कव्हर : फक्त ब्लँकेटच नाही तर उशीचं कव्हरही धुतलं जात नाही तर त्यावरील फक्त धूळ साफ करून ती दिली जाते. त्यामुळे तुम्हाला तसे ते स्वच्छ दिसतील. पण या उशीवर कितीतरी लोक झोपले आहेत, त्यांनी काय काय ठेवलं असेल. म्हणून उशीचं कव्हर स्वच्छ दिसत असलं तरी हात लावू नका, आधी ते बदलायला सांगा.
advertisement
4/7
टीव्ही रिमोट : हॉटेल रूममध्ये टीव्ही असतो. त्यामुळे गेल्या गेल्या काही लोक लगेच रिमोट हातात घेतात आणि टीव्ही लावतात पण या रिमोटवर बरेच बॅक्टेरिया असू शकता. कारण काही लोकांना सवय असते के ते रिमोट बाथरूममध्येही नेतात, अस्वच्छ ठिकाणी ठेवतात, हातही धूत नाहीत, तसेच त्या रिमोटला लावतात.
advertisement
5/7
टेलिफोन : हॉटेल रूममध्ये टेलिफोन ठेवलेला असतो. जेणेकरून हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपर्क करता येईल. त्यामुळे या टेलिफोनला कितीतरी लोकांचे हात लागलेले असू शकतात आणि टेलिफोन काही दररोज स्वच्छ करण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे यावर बॅक्टेरिया असू शकतात.
advertisement
6/7
ग्लास आण कॉफी मग : हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी ग्लास आणि कॉफी किंवा चहासाठी मग-कप ठेवलेले असतात. एका रिपोर्टनुसार हॉटेल कर्मचारी हे न धुता स्वच्छ करतात. त्यामुळे डिस्पोजेबल ग्लास सोबत आणणं चांगलं आहे.
advertisement
7/7
त्यामुळे आता हनीमूनसाठी हॉटेलमध्ये जा किंवा इतर कधीही चुकूनही या वस्तूंना हात लावू नये, हे कायम लक्षात ठेवा. याशिवाय तुमचा हॉटेलबाबत आणखी काही अनुभव असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon Hotel : हनीमूनसाठी हॉटेलमध्ये थांबलात; हॉटेल रूममधील या 5 वस्तूंना चुकूनही हात लावू नये