जीन्सचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या सर्वांत ट्रेंडी जीन्स कोणत्या?
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
फॅशनचं जग खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असेलच असं नाही; पण ज्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जीन्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही अनेक डिझाइन्सच्या जीन्स पाहिल्या असतील; पण त्यांची नावं कदाचित तुम्हाला माहीत नसतील. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या डिझाइनसह त्यांची नावं सांगणार आहोत.
advertisement
1/7

ही स्किनी जीन्स आहे. ती त्वचेवर घट्ट चिकटून असते. ही जीन्स स्टाइल करण्यासाठी तुम्ही फिटेड टॉप घालू शकता. याशिवाय शॉर्ट कुर्तीच्या खालीदेखीलही जीन्स घालता येते. आजकाल अनेक मुली लाँग कुर्तीवरही स्किनी टाइट जीन्स घालून स्टाइल एक्सपरिमेंट्स करत असतात.
advertisement
2/7
आजकाल मॉम जीन्सचा ट्रेंड आहे. मुली मॉम जीन्स खूप खरेदी करतात. तुम्ही या जीन्स क्रॉप टॉपवर स्टाइल करू शकता. लठ्ठ मुलींसाठी हा खूप चांगला ऑप्शन मानला जातो. या जीन्समध्ये अशा मुलींची पर्सनॅलिटी छान दिसते.
advertisement
3/7
टू-टोन्ड जीन्स म्हणजे दोन रंगांची जीन्स होय. ही जीन्सही तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक मुली अशा जीन्स घालण्यास पसंती देतात. तुम्हालाही अशीदोन रंगांची ट्रेंडी जीन्स हवी असेल तर त्याच नावाने दुकानात विचारा.
advertisement
4/7
वाइड लेग जीन्स स्किनी (सडपातळ) मुलींसाठी सर्वांत बेस्ट ऑप्शन आहे. या जीन्स घट्ट टॉपवर घालता येतात. ही जीन्स शूज आणि हील्स दोन्हीवर चांगली दिसते.
advertisement
5/7
या जीन्सचं नाव बॉयफ्रेंड जीन्स आहे. हीदेखील खूप ट्रेंडी जीन्स आहे. कॉलेजच्या मुलीही ही जीन्स खूप घालतात. तुम्ही डेनिम जॅकेटसह ही जीन्स घालू शकता.
advertisement
6/7
स्ट्रेट फिट जीन्स वरून ते बॉटमपर्यंत पूर्णपणे सरळ असतात. पाय सडपातळ असतील तर घट्ट जीन्स चांगली दिसत नाही. त्यामुळे सडपातळ बांधा असलेल्या मुली अशा प्रकारच्या जीन्स घालतात. तुम्ही ही जीन्स हील्ससह स्टाइल करू शकता.
advertisement
7/7
बूटकट जीन्स गुडघ्यापर्यंत टाइट असतात आणि खाली फ्लेअर असतात. ही जीन्स स्टाइल आजची नाही. ती 90च्या दशकातल्या हिरॉइन्स खूप घालायच्या. आता तीन दशकं लोटली असली तरी या जीन्सची फॅशन अद्याप संपलेली नाही.