बायकोच्या या अवयवाला स्पर्श करताच म्हणे नवऱ्यामागील साडेसाती दूर होते
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband leg massage to wife benefits : पतीने पत्नीचे पाय दाबण्याचे असे फायदे आहेत जे एकदा का समजले की कोणताच पुरुष आपल्या बायकोचे पाय दाबायला नकार देणार नाही.
advertisement
1/7

घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा, आवडीनिवडी यावर लक्ष देणं. या सर्वामध्ये महिला खूप थकतात. दिवसभर धावपळ करताना त्यांना ते जाणवतही नाही पण रात्री जेव्हा झोपायला जातात तेव्हा मात्र शरीर दुखू लागतं. विशेषत: पाय.
advertisement
2/7
कुणीतरी पाय दाबून दिले तर बरं होईल असं कित्येक महिलांना वाटतं. विवाहित महिला आपल्या पतीला पाय दाबायला सांगतात. काही पुरुष स्वतःहून पत्नीचे पाय दाबतात पण बहुतेक पुरुषांना पत्नीचे पाय दाबणं म्हणजे स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं.
advertisement
3/7
पत्नीचे पाय दाबल्याने तिला आराम तर मिळेलच. पण पत्नीचे पाय पतीनं दाबणं हे खरंतर पतीसाठीही फायद्याचं आहे. पतीनं पत्नीचे पाय दाबल्याने चमत्कारिक असे परिणाम होतात.
advertisement
4/7
ज्या पुरुषांवर शनीची साडेसाती आहे, त्यांनी आपल्या पत्नीचे गुडघे आणि पाय दाबावेत. त्यांच्यासाठी हा उपाय सर्वात चांगला आहे. शनीची राशी आहे मकर आणि मकर गुडघ्याला दर्शवते. तर पत्नी शुक्र दर्शवते. शनी शुक्राची रास तूळमध्ये उच्च होतो.
advertisement
5/7
हा उपाय फक्त पुरुषांसाठीच नाही तर साडेसाती सुरू असलेल्या महिलांसाठीही आहे. म्हणजे फक्त पतीनंच पत्नीचे नव्हे तर पत्नीनंही पतीचे पाय दाबावेत. दोघांनीही एकमेकांचे पाय दाबण्यात संकोच करू नये.
advertisement
6/7
ही माहिती ज्योतिषतज्ज्ञ किरण आनंद यांनी त्यांच्या keran.numerovastu इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी .
advertisement
7/7
(सूचना - हा लेख ज्योतिषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचं याचं समर्थन करत नाही किंवा अशा गोष्टींना प्रोत्साहीत करण्याचा हेतू नाही.)