TRENDING:

Hotel Facts : हॉटेल रूममध्ये टूथब्रश बाथरूम नाही तिजोरीत ठेवा, विचित्र सल्ला, पण कारण शॉकिंग

Last Updated:
Hotel secrets : हॉटेल रूममध्ये राहताना तुमचा टूथब्रश देखील धोक्यात येऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का?
advertisement
1/7
हॉटेल रूममध्ये टूथब्रश बाथरूम नाही तिजोरीत ठेवा, विचित्र सल्ला, पण कारण शॉकिंग
काही कामानिमित्त किंवा फिरायला बाहेर गेलो की हॉटेलमध्ये राहणं आलंच. हॉटेल रूममध्ये राहताना आपण सामान्यपणे तिथल्या सोयीसुविधा, स्वच्छता आणि सुरक्षितता तपासतो. सुरक्षेच्या बाबतीत म्हणायचं तर शक्यतो कुठे छुपे कॅमेरे नाहीत ना हे तपासतो. कारण याबाबत आता अनेकांना माहिती झाली आहे. तसंच आपल्या मौल्यवान सामानाची काळजी घेतो.
advertisement
2/7
पण तुम्हाला कुणी तुमचा टूथब्रश तिजोरीत ठेवायला सांगितला तर... साहजिकच आश्चर्य वाटले. टूथब्रशमध्ये असं काय आहे की हॉटेल रूममध्ये गेल्यावर तो तिजोरीत जपून ठेवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
3/7
अलीकडेच एका एअर होस्टेसने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने हॉटेलमधील काही डर्टी सीक्रेट्स उघड केली आहेत. ज्यात तिने टूथब्रशशी संबंधित काही रहस्य सांगितली आहेत.
advertisement
4/7
32 वर्षीय अर्जेंटिनाची एअर होस्टेस बार्बीबॅक ला अझाफाटा स्पेनची एअरलाइन व्हुएलिंगमध्ये काम करते. जी इन्स्टाग्रामवर प्रवासाशी संबंधित टिप्स शेअर करत राहते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात तिने हॉटेलमध्ये राहताना टूथब्रश तिथल्या तिजोरीत बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
5/7
बार्बीबॅक देखील तेच करते. यामागे तिने दिलेलं कारणही खूप धक्कादायक आहे. बार्बीबॅकने हॉटेलशी संबंधित काही अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे लोक घाबरले.
advertisement
6/7
न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार , एअर हॉस्टेसचा दावा आहे की हाऊसकीपिंग कर्मचारी कधीकधी त्यांच्या मॅनेजरवर रागावतात आणि त्यांचा राग काढण्यासाठी ते हॉटेलमध्ये राहणाऱ्या गेस्टच्या वैयक्तिक वस्तूंशी छेडछाड करतात.
advertisement
7/7
ती म्हणाली, बऱ्याच वेळा बाथरूम टूथब्रशने स्वच्छ केलं जातं. टूथब्रशचा गैरवापर झाल्याची बरीचं प्रकरणं तिनं ऐकली आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये राहाल तेव्हा तुमचा टूथब्रश सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास विसरू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hotel Facts : हॉटेल रूममध्ये टूथब्रश बाथरूम नाही तिजोरीत ठेवा, विचित्र सल्ला, पण कारण शॉकिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल