Maharashtra Board 12th HSC Result 2024 : बारावीत यंदाही मुलींचीच बाजी; कोणत्याही परीक्षेत मुलीच का अव्वल येतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्ड परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा बऱ्यादा मुलीच परीक्षांमध्ये अव्वल येतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण असं का असतं?
advertisement
1/5

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल <a href="https://news18marathi.com/india-result/msbshse-mh-board-12th-result/">(Maharashtra Hsc Result)</a> लागला आहे. बारावीच्या निकालात <a href="https://news18marathi.com/maharashtra/maharashtra-board-hsc-result-2024-today-12th-result-check-online-mahresult-nic-in-mhsy-1185542.html">यंदाही मुलींनीच बाजी मारल्याची माहिती</a> बोर्डाने दिली आहे. कोणत्याही शैक्षणिक परीक्षांमध्ये मुलीच अव्वल का येतात? याबाबत ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने अभ्यास केला होता. <a href="https://mahresult.nic.in/" target="_blank" rel="noopener">बारावीचा निकाल इथे पाहा</a>.
advertisement
2/5
सर्वेक्षणानुसार मुलींमध्ये वाचनाची आवड जास्त असले. अनेक मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही. म्हणून मुलींपेक्षा मुलांना कमी ज्ञान असते. निम्म्यापेक्षा कमी मुली दिवसभरातून किमान अर्धा तास वाचन करतात. एक तृतीयांशपेक्षा कमी मुलं इतका वेळ वाचन करतात.
advertisement
3/5
कॅनडातील न्यू ब्रन्सविक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार मुलींची लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता चांगली असते. पण मुलं अधिक लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत, म्हणून ते परीक्षेत कमी पडतात.
advertisement
4/5
संशोधनानुसार मुलं मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ऑनलाईन गेम खेळतात. इंटरनेटचा वापर जास्त करतात. त्यांना कुटुंबाकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. मुली कुटुंबासह अधिक वेळ घालवतात. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/congratulations-wishes-in-marathi-messages-quotes-shubhechcha-for-loved-ones-mhpj-1185375.html">कुटुंबाकडून चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन</a> मिळतं.
advertisement
5/5
हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. मुलं आणि मुली असा भेदभाव करण्याचा न्यूज18मराठीचा हेतू बिलकुल नाही. योग्य आणि पात्रतेनुसार अभ्यास केला तर कुणीही कुठेही कमी पडत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Maharashtra Board 12th HSC Result 2024 : बारावीत यंदाही मुलींचीच बाजी; कोणत्याही परीक्षेत मुलीच का अव्वल येतात?