Money Magnet : पैसे देताना मनात फक्त 'हा' नंबर म्हणा; दुप्पट होईल तुमच्या खिशातला पैसा
- Published by:Priya Lad
Last Updated:
पैसे खर्च करताना किंवा देताना ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. या नियमांचं पालन केल्यास पैसा वाढेल असा दावा ज्योतिष तज्ज्ञांनी केला आहे. त्यापैकीच एक आहे हा मॅजिकल नंबर.
advertisement
1/7

आपल्याकडे भरपूर पैसा हवा असं कुणाला वाटत नाही. पैसा आला तरी तो कुठे ना कुठे खर्च करावा लागतो. पण पैसे खर्च करताना किंवा कुणालाही देताना एक असा ज्योतिषी उपाय ज्यामुळे तुमचे पैसे दुप्पट होतील.
advertisement
2/7
सर्वात पहिलं म्हणजे कुणालाही पैसे देताना ते कसे द्यायचे हे लक्षात घ्या. पैशांची नोट देताना नेहमी ती मध्ये दुमडा आणि ज्या बाजूने नोट उघडते ती बाजू स्वतःकडे ठेवा.
advertisement
3/7
ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. अशा पद्धतीने नोट दिल्याने ती ऊर्जा तुमच्याकडे पुन्हा येते. म्हणजे पैसे खर्च केल्यानंतरही पैसा तुमच्याकडे पुन्हा येईल.
advertisement
4/7
दुसरं म्हणजे सगळीकडे ऊर्जा आहे तर पैसे देताना, खर्च करण्याआधी मग ते कॅशने असो वा डिजीटल माध्यमातून एक नंबर तुमच्या मनात तीन वेळा बोला. यामुळे तुम्हाला खर्च केलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे मिळतील.
advertisement
5/7
आता हा नंबर कोणता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा नंबर आहे 1403. रात्री झोपण्याधीसुद्धा हा नंबर बोटांनी हवेत लिहा आणि लगेच पाणी प्या.
advertisement
6/7
ज्योतिष तज्ज्ञ आचल यांनी हा उपाय सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या anchaltarot या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. <a href="https://www.instagram.com/reel/C7wRudCSPEr/?igsh=MTVteGtxZWV1bXM5Ng%3D%3D">व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा</a>.
advertisement
7/7
सूचना : हा लेख सोशल मीडियावर ज्योतिष तज्ज्ञांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा याचं समर्थन करत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Money Magnet : पैसे देताना मनात फक्त 'हा' नंबर म्हणा; दुप्पट होईल तुमच्या खिशातला पैसा