TRENDING:

धावत्या एक्स्प्रेसमध्ये लेकीचा जन्म, प्रवाशांनी केली प्रसूती; नाव ठेवलं 'लय भारी'

Last Updated:
लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण याच लोकलमधून दररोज लाखो चाकरमानी कामावर जातात. तसंच देशभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांमधून हजारो प्रवासी प्रवास करृतात. कधी ट्रेनमध्ये भांडण होतं, तर कधी नव्या ओळखी होतात. आता तर चक्क एका आईने एक्स्प्रेसमध्ये आपल्या बाळाला जन्म दिला. प्रवाशांनी तिची प्रसूती केली. रेल्वे गाडीत प्रसूती होण्याची ही आतापर्यंतची पहिली घटना नाहीये, परंतु ही घटना खास आहे. (विकाश पांडेय, प्रतिनिधी / पाटणा)
advertisement
1/6
धावत्या एक्स्प्रेसमध्ये लेकीचा जन्म, प्रवाशांनी केली प्रसूती; नाव ठेवलं लय भारी
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये ही महिला नाशिकहून चढली. तिला मध्यप्रदेशातील सतनामध्ये जायचं होतं. मुंबई-वाराणसी कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासातच तिच्या बाळाचा जन्म झाला. जनरल कोचमधल्या इतर महिला प्रवाशांनी यावेळी तिची मदत केली. विशेष म्हणजे बाळाचं नावही तिथंच ठेवण्यात आलं. 
advertisement
2/6
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्ण मुरारी रावत हे नाशिकमध्ये मेकॅनिकचं काम करतात. ते आपली पत्नी रेशमा यांच्यासह कामायनी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून सतनाला जात होते. गाडी इटारसी स्टेशनला आली तेव्हा रात्री साधारण 3 वाजण्याच्या सुमारास त्यांना कळा सुरू झाल्या. भोपाळला पोहोचेपर्यंत त्यांच्या कळा प्रचंड वाढल्या. त्यांची परिस्थिती पाहून इतर प्रवाशांनी भोपाळ-विदिशा स्टेशनदरम्यान चालत्या ट्रेनमध्ये त्यांची प्रसूती केली.
advertisement
3/6
सर्व महिला रेशमा यांच्या मदतीला धावून आल्या. पुढचा-मागचा विचार न करता त्यांनी मोठ्या धैर्याने त्यांची प्रसूती केली. रेशमा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता आई आणि बाळ दोघीही सुखरूप आहेत.
advertisement
4/6
त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका तरुणाने सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास याबाबत आरपीएफ जवानांना माहिती दिली. त्यानंतर स्टेशन मास्टरांनी ट्रेन स्टेशनला पोहोचताच अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून रेशमा यांना रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
5/6
बाळाचा जन्म होताच सर्व प्रवाशांनी कृष्ण मुरारी आणि रेशमा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. कामायनी एक्स्प्रेसमध्ये जन्म झाला म्हणून कृष्ण मुरारी यांनी आपल्या लेकीचं नाव 'कामायनी' ठेवलं.
advertisement
6/6
मुलीच्या जन्मानंतर कृष्ण मुरारी यांनी सर्व प्रवाशांचे आभार मानले. दरम्यान, एका महिलेला असह्य वेदना होत असताना अनोळखी लोकांनी तिच्या मदतीला धावून येणं आणि वैद्यकीय क्षेत्रातलं कोणतंही ज्ञान नसताना तिची यशस्वीरित्या प्रसूती करणं हे खरोखर कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
धावत्या एक्स्प्रेसमध्ये लेकीचा जन्म, प्रवाशांनी केली प्रसूती; नाव ठेवलं 'लय भारी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल