मनात भरला भाजीवाला! फिलिपाइन्स सोडून भारतात आली, बनली 'फॉरेनची भाजीवाली'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Viral Love story : प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. अशीच एका भाजीवाल्याची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
advertisement
1/7

सामान्यपणे लग्न करताना आपला नवरा इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक, वकील असावा अशी अपेक्षा असते. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एक परदेशी तरुण चक्क भारतातील भाजीवाल्याचा प्रेमात पडली. इतकंच नव्हे तर तिनं त्याच्यासाठी स्वतःचा देश सोडून भारतात येऊन त्याच्याशी लग्नही केलं.
advertisement
2/7
गुजरातमध्ये राहणारा पिंटू, होलसेल भाज्यांचा व्यापारी आहे, त्याच्या प्रेमात पडली ती फिलिपाइन्समधील तरुणी. पिंटूने एकदा फिलिपाइन्समध्ये राहणाऱ्या तरुणीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तरुणी तिच्या वडिलांसोबत रेस्टॉरंट चालवत होती.
advertisement
3/7
पिंटूला इंग्रजी फार येत नव्हतं. हाय, हेलो इतकंच त्यांचं बोलणं. बाकीचा संवाद त्यांचा इमोजी आणि व्हिडीओमधूनच व्हाययचा.
advertisement
4/7
पिंटू म्हणाला, आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकत नव्हतं. पण तिचं हास्य सगळं काही सांगायचं. तर तरुणीला पिंटूचा दयाळू, संवेदनशील आणि प्रामाणिक आहे. त्याच्या याच गुणावर मी फिदा झाली, असं ती सांगते.
advertisement
5/7
एकदा पिंटूने तिला एक पार्सल पाठवलं. एका गिफ्टमार्फत त्याने तिला प्रपोज केलं. व्हिडीओ कॉलवर तिनं ते पार्सल उघडलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिनं त्याला लगेच होकार दिला.
advertisement
6/7
होकार दिल्यानंतरही दोघं दोन वर्षे लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर पिंटू तरुणी आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी फिलिपाइन्सला गेला. तिच्या कुटुंबालाही पिंटू आवडला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/7
त्यांचं लग्न ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीनं झालं. प्रेमाला कोणत्या भाषेची गरज नसते, हेच या दोघांच्या लव्हस्टोरीने दाखवलं आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मनात भरला भाजीवाला! फिलिपाइन्स सोडून भारतात आली, बनली 'फॉरेनची भाजीवाली'