वादळ आलं आणि घडला चमत्कार! कोरड्याठाक वाळवंटात जणू 'स्वर्ग'च अवतरला
- Published by:Priya Lad
Last Updated:
जगातील सर्वात कोरडा प्रदेश म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण. जिथं एक शक्तिशाली वादळ आलं. जो देवाचा कोप समजला जात होता पण ते वरदान ठरलं. निसर्गाचा चमत्कार दिसून आला.
advertisement
1/7

मोरोक्कनचं वाळवंट हे जगातील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक आहे. मात्र 7 आणि 8 सप्टेंबर रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे वर्षभरापेक्षा जास्त पाऊस झाला. या मुसळधार पावसाने तिथं प्रचंड विध्वंस केला आणि अनेकांनी याला देवाचा कोप असंही म्हटलं. मात्र, आता तो पाऊस मोरोक्कोच्या वाळवंटासाठी वरदान ठरत आहे.
advertisement
2/7
गेल्या महिन्यात उत्तर-पश्चिम आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मोठा पूर आला आणि मोठ्या प्रमाणात नासधूस झाली.
advertisement
3/7
मोरक्कन सरकारने सांगितलं की, सप्टेंबरच्या या दोन दिवसांत वर्षभरापेक्षा जास्त पाऊस पडला. एवढ्या कमी कालावधीत इतका पाऊस होऊन 30 ते 50 वर्षे झाली आहेत, असं मोरोक्कोच्या हवामानशास्त्र महासंचालनालयाचे हुसेन युआबेब यांनी सांगितलं.
advertisement
4/7
या कोरड्या वाळवंटातील अशा मुसळधार पावसाला अनेकांनी देवाचा कोपही म्हटलं होतं. मात्र हे मोरोक्कोसाठी वरदान ठरत असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
5/7
मोरोक्कोच्या बहुतांश भागात सलग सहा वर्षे तीव्र दुष्काळ पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतं रिकामी ठेवावी लागली आणि शहरांपासून खेड्यापर्यंत पाण्यासाठी रेशनिंग करावं लागलं.
advertisement
6/7
मात्र, आता या पावसामुळे वाळवंटाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या पावसानंतर मोरोक्कोच्या कोरड्या वाळवंटात एक तलाव तयार झाला. त्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
advertisement
7/7
या पावसानंतर कोरड्या वाळवंटात पाण्याची नदी निर्माण झाली असून तलावाच्या काठावरील सखल भागात झाडंझुडपं झपाट्याने वाढू लागली आहेत. कोरडंठाक मोरोक्को आता हिरवंगार होऊ लागलं आहे, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणता येईल. दूरदूरहून पर्यटक हा चमत्कार पाहायला येत आहेत.