TRENDING:

summer tips : घरात AC चालू, फॅन, लाईटही, मग बिल कसं कमी करायचं? सोप्पा फॉर्म्युला

Last Updated:
देशभरात सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. उष्माघातानं मृत्यू झाल्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. या उन्हाळ्याला तोंड देताना आपण हैराण होत असतो. अशा वेळी थंड हवा घरभर पसरवणारा एअर कंडिशनर आपल्याला दिलासा देतो
advertisement
1/9
summer tips : घरात AC चालू, फॅन, लाईट, मग बिल कसं कमी करायचं? सोप्पा फॉर्म्युला
उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी तपमान इतकं वाढतं की लोकांना नकोसं होतं. काही भागात तर इतकं तापमान वाढतं की लोक घराबाहेर जाणं देखील टाळतात. तर काही भागात जेवण शिजेल इतकं भयानक तापमान असतं.
advertisement
2/9
उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असताना आल्हाददायक एसी आपल्या विजेच्या बिलाचा आकडा वाढवेल की काय या विचारानं आपण पुन्हा घामाघूम होतो आणि एसीचा आनंद विसरून जातो. बिल नियंत्रित राखण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील.
advertisement
3/9
एसीचं तापमान कमी ठेवलं की आपल्याला अधिक गारवा मिळतो. हे खरं असलं तरी, द ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 अंश सेल्सिअस तापमानावर एसी वापरला तर ते योग्य आहे.
advertisement
4/9
आपल्या शरीराच्या तापमानासाठी एसी याच तापमानावर असावा. ते एक युनिट कमी केल्यास विजेचा वापर सहा टक्क्यांनी वाढतो. त्यामुळं ते टाळण्यासाठी 24 अंशांवर एसी ठेवून घरामध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण करता येईल.
advertisement
5/9
एसीचा कंडेंसर हा नेहमी घराबाहेर बसवला जातो. विंडो एअर कंडिशनर किंवा स्प्लिट एअर कंडिशनर या दोन्ही बाबतीत हीच पद्धत वापरली जाते; पण यात धूळ साचून फिल्टर खराब होऊ शकतो. परिणामी तो पुरेसं काम करू शकत नाही आणि विजेचा जास्त वापर होतो. त्यामुळं विजेचा खर्च वाचवणं आणि घरातही शुद्ध हवा मिळणं, यासाठी एसीचा फिल्टर नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये एकदा तरी याचं सर्व्हिसिंग करून घेणं आवश्यक आहे.
advertisement
6/9
घरात हवा खेळती राहण्यासाठी तसंच एसीमधून होणाऱ्या कूलिंगचा वेग वाढवण्यासाठीसुद्धा घरातला सीलिंग फॅन तुम्ही चालू ठेवू शकता. यामुळं पूर्ण खोली एकसारखी गार होईल. हवेचा प्रवाह घरात चांगला राहील आणि खोलीचं तापमानसुद्धा नियंत्रित राहील. आपल्याला आरामदायी वाटण्यासाठी आणि अतिरिक्त हवा खेळती राहण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.
advertisement
7/9
घरातल्या एसीमधून येणारा गारवा आणि त्याची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी नेहमी दरवाजे, खिडक्या पूर्ण बंद करून घ्या. खोलीतली गार हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या. दरवाजा, खिडकी उघडी राहिल्यास एसीचा थंडावा बाहेर जाऊन विजेचं बिल जास्त येऊ शकतं. कारण बाहेरची हवा आत आल्यानं खोली गार ठेवण्यासाठी एसीमधली यंत्रणा अधिक काम करू लागते आणि परिणामी आपल्याला बिल जास्त येतं.
advertisement
8/9
एसीचा टायमर का लावावा, याचं साधं आणि सोपं उत्तर म्हणजे शांत झोप आणि विजेची बचत हवी असेल तर याचा वापर नक्की करावा. झोपण्यापूर्वी एसी ऑटो मोडवर ठेवू शकता. म्हणजे खोली पुरेशी थंड झाल्यावर तो आपोआप बंद होईल. रात्री झोपमोड होऊन उठण्यापेक्षा टायमरचा उपयोग केला तर कमीत कमी विजेचा वापर होईल.
advertisement
9/9
तसंच पूर्ण दिवस एसी चालू ठेवणंसुद्धा टाळू शकता. दिवसभरातसुद्धा ठरावीक वेळानंतर तो बंद होण्यासाठी टायमरचा वापर करता येईल. अन्यथा एसीच्या अंतर्गत यंत्रणांवर ताण येतो. टायमर वापरून विजेची बचतही होईल आणि एसीची कार्यक्षमतासुद्धा चांगली राहण्यास मदत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
summer tips : घरात AC चालू, फॅन, लाईटही, मग बिल कसं कमी करायचं? सोप्पा फॉर्म्युला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल