TRENDING:

Shocking! टनलमध्ये घुसताच अचानक गायब झाली ट्रेन; फक्त 2 प्रवासी वाचले, त्यांनी सांगितलं असं काही की...

Last Updated:
बरमुडा ट्रँगलबाबत सर्वांनाच माहिती आहे. या ठिकाणाच्या वरून उडणारी विमानं अचानक गायब होतात. असंच एक टनल आहे, जिथं एक ट्रेन घुसली पण ती अचानक गायब झाली. आजही ते रहस्य बनलं आहे.
advertisement
1/8
टनलमध्ये जाताच गायब झाली ट्रेन; फक्त दोघं वाचले, त्यांनी सांगितलं असं काही की...
इटलीच्या जेनेटी रेल्वे कंपनीने 1911 मध्ये एक नवीन ट्रेन बनवली. जेनेटी असं या ट्रेनचं नाव. त्याच्या डब्यांपासून इंजिन सर्वकाही नवीन होतं. रोमच्या एका स्टेशनवरून ही ट्रेन 1911 साली ट्रायल म्हणून चालवली गेली.  
advertisement
2/8
कंपनीनं ट्रायलदरम्यान लोकांना यातून मोफत प्रवास करण्याची संधी दिली होती. रेल्वे कर्मचारी मिळून एकूण 104 लोक होते.  पुढच्या स्टेशनवर अनेक प्रवासी या ट्रेनची प्रतीक्षा करत होते पण ट्रेन तिथं पोहोचलीच नाही. ती एका टनलमध्ये घुसली आणि तिथून बाहेर पडलीच नाही. टनलमध्येच ती अचानक गायब झाली. 
advertisement
3/8
ट्रेनच्या बोगद्याबाहेर दोन लोक बाहेर पडलेले मिळाले. जे दोघं या ट्रेनमधून प्रवास करत होते. ट्रेनसह ट्रेनमधील हे दोन प्रवासी सोडता बाकी सर्व प्रवासीही गायब झाले.
advertisement
4/8
शास्त्रज्ञांनी या दोन प्रवाशांना नेमकं काय घडलं याबाबत विचारलं. तरी घटनेचं रहस्य उलगडलं नाही. एकाने सांगितलं की टनलमधून घुसून ट्रेनला दुसऱ्या स्टेशनवर पोहोचायचं होतं पण ती तिथं पोहोचली नाही. टनलमध्येच गायब झाली. 
advertisement
5/8
दुसऱ्याने सांगितलं की ट्रेन टनलजवळ पोहोचली तेव्हा त्यातून रहस्यमयी धूर बाहेर पडचाना दिसला. त्यानंतर दोघांनीही घाबरून ट्रेनमधन उडी मारली.  त्यांच्या डोळ्यादेखत ट्रेन बोगद्यात गेली पण परत बाहेरच आली नाही. ते नेमके बाहेर कसे आले ते त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. 
advertisement
6/8
या ट्रेनबाबत बऱ्याच अफवा आहेत. काही लोक म्हणतात ट्रेननं टाइम ट्रॅव्हल केलं आणि ती दुसऱ्या जगात पोहोचली. काही लोकांच्या मते, ट्रेनला कोणत्यातरी शक्तीनं पकडलं आहे. टाइम ट्रॅव्हल करत ती भूतकाळात पोहोचली. काही लोक म्हणतात ही ट्रेन आपल्या काळापेक्षा 71 वर्षे मागे गेली असावी.
advertisement
7/8
काही लोकांनी दावा केला आहे की या ट्रेनचे काही भाग रशिया, युक्रेन आणि जर्मनीत मिळाले आहेत. पण याचे ठोस पुरावे कुणाकडेच नाहीत. काही लोकांनी ही ट्रेन मेक्सिकोमध्ये असल्याचाही दावा केला आहे. ही ट्रेन 1840 मध्ये मेक्सिकोमध्ये पोहोचली. एका डॉक्टरने दावा केला आहे की त्याच्या रुग्णलयात 104 लोकांना रहस्यमयी पद्धतीनं भरती करण्यात आलं आहे. सर्वजण वेडे झाले होते त्यांनी सांगितलं की ते सर्व लोक ट्रेनमधून हॉस्पिटलमध्ये आले.
advertisement
8/8
गेल्या 100 वर्षांपेक्षा अधिक कालावधीहून या ट्रेनचा शोध सुरू आहे. पण काहीच धागेदोरे मिळाले नाहीत. या ट्रेनला लोक झपाटलेली ट्रेन म्हणू लागले. दरम्यान जिथं ही ट्रेन गायब झाली ते टनल पूर्णपणे बंद करण्यात आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Shocking! टनलमध्ये घुसताच अचानक गायब झाली ट्रेन; फक्त 2 प्रवासी वाचले, त्यांनी सांगितलं असं काही की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल