विमानाचे तिकीट दर कधी असतात कमी, कधी बुकिंग केल्यास होतो स्वस्तात प्रवास?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करावा, हे स्वप्न आपण लहानपणापासून उराशी बाळगतो. त्यामुळे पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव अत्यंत रोमांचक असतो. विमानानं कुठेही जायचं म्हटलं तरी खर्च मात्र जास्तच करावा लागतो. तुम्हाला माहितीये का, विमान तिकीट महागडं असतं यात काही दुमत नाही पण जरा ट्रिक वापरून तिकीट बूक केलं तर त्यातूनही आपली बचत होऊ शकते.
advertisement
1/5

विमानातून ढग कसे दिसतात, जमीन कशी दिसते याबाबत सर्वांनाच कुतूहल असतं. विमान प्रवासाचा अनुभव हा अनेकजणांसाठी जणू सुखद धक्का असतो. परंतु त्याचं तिकीट मात्र परवडणारं नसतं. तरी त्यातल्या त्यात बचत कशी होऊ शकते, जाणून घेऊया.
advertisement
2/5
असं म्हणतात की, आठवड्यातून 2 दिवस विमान तिकिटं स्वस्त असतात, हे दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार. या दिवशी जवळपास 8 ते 15 टक्के कमी दरानं विमान तिकीट मिळू शकतं. तसंच...
advertisement
3/5
विमान तिकिटांचं बुकिंग कधीही सकाळी 6 वाजताच्या दरम्यान करायचं. इतर वेळांच्या तुलनेत या वेळेत विमानाचं तिकीट परवडतं. तर, संध्याकाळी आणि रात्री मात्र विमानांचे तिकीट दर सर्वाधिक असतात.
advertisement
4/5
कुठेही जायचं असेल तरी शक्यतो महिनाभर आधी विमानाचं तिकीट बुक केलं तर उत्तम. महिन्याच्या 28 तारखेला बुकिंग केलं तर सर्वोत्तम. त्यामुळे बचत होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे...
advertisement
5/5
शक्यतो कधीच शनिवारी किंवा रविवारी विमानाचं तिकीट बुक करायचं नाही. तसंच बुकिंग करताना फ्लेक्सिबल डेट निवडायची, ज्यामुळे नंतर आवश्यकता असल्यास अधिकचे पैसे न देता प्रवासाची तारीख बदलता येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
विमानाचे तिकीट दर कधी असतात कमी, कधी बुकिंग केल्यास होतो स्वस्तात प्रवास?