Viral News : सापानं खाल्लं तरी पोट फाडून बाहेर येतात 'हे' प्राणी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
साप हा भयानक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या तावडीतून सुटणं हे खूपच अवघड आहे. साप दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना गिळून घेतात मात्र असे काही प्राणी आहेत जे सापाचं पोट फाडूनही बाहेर येतात. हे प्राणी कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/5

सेंटीपीड्स दिसायला लहान असतो मात्र अतिशय क्रूर प्राणी आहे. ते सहजपणे हार मानत नाहीत. डेली मेलच्या वृत्तानुसार, 2014 मध्ये एका वाइपरने 5.9-इंच सेंटीपीड गिळला होता. काही वेळाने तो सापाचं पोट फाडून बाहेर आला. मात्र, दोघेही वाचले नाहीत आणि दोघांचाही मृत्यू झाला.
advertisement
2/5
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 2015 मध्ये फ्लोरिडामध्ये एक विचित्र घटना घडली होती. एका मोठ्या अजगराने 3.2 फुटाची मगर गिळली. मरेपर्यंत मगरी लढत राहिली. त्यामुळे गिळल्यानंतर काही क्षणातच अजगराचे पोट फुटले. तज्ज्ञांनुसार, मगरीने अजगराचं पोट कापलं होतं.
advertisement
3/5
2005 मध्ये 13 फूट लांबीच्या अजगराने 6 फूट लांबीच्या मगरीला गिळण्याचा प्रयत्न केला होता. अर्धे शरीर आत गेले. त्यामुळे दोघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. मगरीचे डोके, खांदे आणि पुढचे पाय अजूनही सापाच्या शरीराच्या खालच्या भागात अडकले होते. पण साप मधूनच फाडला गेला होता.
advertisement
4/5
पोर्क्युपाइन्सचे शरीर काटेरी असते. असं असूनही साप अनेकदा त्यांना खातात. पण 2015 मध्ये न्यूजवीकमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यावरून एका अजगराने पोर्क्युपिन खाल्ल्यं परिणामी त्याचं पोट सुजलं. नंतर त्यानं सापाचं पोट फाडलं. पोर्क्युपिन आतमध्ये धडपडत असल्याचं आढळून आलं त्यामुळे सापाच्या पोटात जखमा झाल्या होत्या. शास्त्रज्ञांना शंका आहे की पोर्क्युपिनचा काटा सापाच्या पचनसंस्थेला किंवा एखाद्या महत्वाच्या अवयवाला टोचला असावा. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
advertisement
5/5
गायींना अनेकदा अजगरांसारखे मोठे साप पकडून गिळण्याचा प्रयत्न करतात. 2021 मध्ये एक घटना समोर आली, ज्यामध्ये अजगराने एक मोठी गाय गिळण्याचा प्रयत्न केला. गाय खूप लढली पण ती मेली. दुसरीकडे सापाची अवस्था वाईट होती. त्यांचे पोट फुटले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.