कडाक्याच्या थंडीतही वीज कर्मचाऱ्यांना फुटला घाम, फक्त एका ग्राहकाचं लाइट बिल मोजण्यासाठी लागले तब्बल 5 तास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahavitaran electricity bill : महावितरणचं थकीत वीज बिल भरण्यासाठी ग्राहकानं अर्ध पोतं भरून नाणी दिल्याने चर्चेचा विषय ठरला.
advertisement
1/7

चिल्लर नाणी देऊन वीज बिलाचा भरणा करण्याचा अनोखा प्रकार वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये पाहायला मिळाला आहे.
advertisement
2/7
शहरातील एका व्यापाऱ्याकडे महावितरणचं वीज बिल थकीत होतं. ते बिल भरण्यासाठी त्या व्यापाऱ्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे चक्क नाणी आणली.
advertisement
3/7
अर्ध पोतं भर नाणी त्याने दुचाकीवरून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महावितरण कार्यालयात नेली.
advertisement
4/7
वीज बिल भरण्यासाठी जी चिल्लर दिली ती चलनात असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ती स्वीकारावी लागली. त्यांना नकार देता आला नाही.
advertisement
5/7
रोखपाल प्रशांत थोटे, लाईनमन उद्धव गजभार आणि अतुल थेर यांनी मिळून ही चिल्लर नाणी मोजण्यास सुरुवात केली.
advertisement
6/7
ही नाणी मोजण्याचं काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मोजताना कर्मचाऱ्यांना या कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला.
advertisement
7/7
थोडी थोडकं नव्हे तर तब्बल 7 हजार 160 रुपयांचं बिल. जे 1 आणि 2 रुपयांच्या नाण्यात देण्यात आलं. या नाण्यांचं वजन 40 किलो होतं. नाणी मोजायला त्यांना तब्बल 5 तास लागले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कडाक्याच्या थंडीतही वीज कर्मचाऱ्यांना फुटला घाम, फक्त एका ग्राहकाचं लाइट बिल मोजण्यासाठी लागले तब्बल 5 तास