TRENDING:

अशी मिठाई जिचं नाव घेतलात तरी होईल 'पिटाई'; तरी आवडीनं खातात लोक

Last Updated:
या मिठाईचं नावच इतकं विचित्र आहे की तुम्ही घेताना चुकलात, चुकीचं उच्चारलात तर तुमचं काही खरं नाही. त्यामुळे या मिठाईबाबत आधीच माहिती करून घ्या.
advertisement
1/7
अशी मिठाई जिचं नाव घेतलात तरी होईल 'पिटाई'; तरी आवडीनं खातात लोक
भारतात बरेच लोक जेवणाचा शेवट गोड करतात. म्हणजे जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ किंवा मिठाई खातात. मिठाईचे बरेच प्रकार आहे, त्या त्या ठिकाणाची ती खासियत असते.
advertisement
2/7
पेढा, लाडू, गुलाबजामुन, रसगुल्ला, जिलेबी, मालपुआ, काजू कतली, सोनपापडी या काही प्रसिद्ध प्रमुख मिठाई आहेत. पण काही मिठाई अशा आहेत, ज्या त्या त्या ठिकाणीच मिळतात. ज्यांची नावं अनेकांना माहिती नाही.
advertisement
3/7
अशीच एक मिठाई जी बेसन, तूप आणि साखरेपासून बनवली जाते. तिचा सुगंध आणि चवही उत्तम आहे. मिठाईची खासियत म्हणजे खूप नाजूक आणि नरम असते.
advertisement
4/7
ही मिठाई शक्यतो सणासुदीच्या काळात आणि काही खास कार्यक्रमाच्यावेळीच ती बनवली जाते. याची किंमत प्रतिकिलो 500 रुपये आहे.  घेण्यासाठी लोकांची खूप गर्दीही होते.
advertisement
5/7
पण या मिठाईचं नाव इतकं विचित्र आहे की उच्चारताना जरा जपूनच. कारण मिठाईचं नाव घाईघाईत उच्चारलात किंवा बोलताना चुकलात तर मात्र तुमची पिटाई होऊ शकते.
advertisement
6/7
ही मिठाई कोणती आणि ती कुठे मिळते ती जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ही मिठाई मिळते ती राजस्थानच्या जोधपूरमध्ये. फक्त जोधपूरच नव्हे तर संपूर्ण राजस्थानात ती फेमस आहे. द फुडी लॉयर इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मिठाईबाबत माहिती देण्यात आली आहे.
advertisement
7/7
आता या मिठाईचं नाव असं आहे तरी काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तिचं नाव आहे चुटिया चक्की. हे नाव घेताना कदाचित तुम्ही चुकाल आणि तुमच्या तोंडून चुकून अपशब्द निघेल. कुणासमोर ते बोललात तर तुमची पिटाई पक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
अशी मिठाई जिचं नाव घेतलात तरी होईल 'पिटाई'; तरी आवडीनं खातात लोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल