TRENDING:

Weird - असं ठिकाण जिथं जाण्याची हिंमत साप करत नाही; शोधून एकसुद्धा सापडणार नाही कारण...

Last Updated:
असं ठिकाण जिथं एकही साप नाही, यामागे एक कारणही आहे.
advertisement
1/8
असं ठिकाण जिथं जाण्याची हिंमत साप करत नाही; शोधून एकसुद्धा सापडणार नाही
साप जे सामान्यपणे जंगलात असतात. पण तरी कधी कुणाच्या शेतात तर कधी कुणाच्या घरातही सापडल्याचं दिसलं आहे. पण एक असं ठिकाण जिथं जाण्याची हिंमत कदाचित <a href="https://news18marathi.com/tag/snake-news/">साप</a>ही करत नाही. कारण या ठिकाणी शोधूनही एकसुद्धा साप सापडणार नाही.
advertisement
2/8
क्वोरावर विचारण्यात आलेल्या प्रश्नात या ठिकाणाचं नाव आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. बेटांनी बनलेला हा देश जिथं अनेक वन्य प्राणी आढळतात, पण इथं एकही साप आढळला नाही. इथं सरपटणारे प्राणी म्हणून फक्त सरडेच आढळतात.
advertisement
3/8
हे ठिकाण आहे न्यूझीलंड. जिथं देशात सापांना बंदी आहे. त्यांचं हे धोरण योग्य आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर युझर्सनी माहिती दिली आहे.
advertisement
4/8
पायल क्षोत्री नावाच्या युझरने सांगितलं,  न्यूझीलंडचं सर्पविरोधी धोरण विचित्र आहे, पण त्यामागे एक कारण आहे. सुमारे एक हजार वर्षापूर्वी या बेटावर मानवी हालचाली सुरू झाल्या, तेव्हापासून इथं अनेक प्राणी कमी झाले.
advertisement
5/8
सुमारे एक तृतीयांश पक्षी आणि डझनभर जंगलं नष्ट झाली. अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे साप इथं आले तर इतर अनेक प्रजाती धोक्यात येऊ शकतात. त्यामुळेच सापांबाबत न्यूझीलंडचं इतकं कठोर धोरण आहे.
advertisement
6/8
तर पियुष कुमार नावाच्या युझरने सांगितलं की, असा कोणताही देश नाही जो प्राणी, वनस्पती आणि बियांच्या आयातीवर काही निर्बंध लादत नाही. पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन हे निर्णय घेतले जातात. न्यूझीलंडमध्येही कोणत्याही जातीचा साप देशात आणण्यास बंदी आहे.
advertisement
7/8
न्यूझीलंडच्या हद्दीत साप नसतात असं नाही, तेथील भोवतालच्या समुद्रात अनेक प्रकारचे साप आढळतात. पण तेही पाण्यातून जमिनीवर कधीच येत नाहीत. यामागे काय कारण आहे ते माहिती नाही.
advertisement
8/8
पण न्यूझीलंड सरकार आणि लोकांचा असा विश्वास आहे की आता सापांचं आगमन त्यांच्या देशासाठी धोकादायक ठरू शकते. हेच कारण आहे की व्यापारी जहाजातून जरी साप आले तरी त्यांना तिथून लगेच काढून टाकलं जातं जेणेकरून ते बेटांवर राहणार नाहीत. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird - असं ठिकाण जिथं जाण्याची हिंमत साप करत नाही; शोधून एकसुद्धा सापडणार नाही कारण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल