TRENDING:

Salt Tea : चहामध्ये मीठ टाकून प्यायलं तर काय होईल?

Last Updated:
Salt in tea : चहामध्ये मीठ वाचूनच थोडं विचित्र वाटेल. पण चहामध्ये मीठ टाकून प्यायल्याने काय परिणाम होईल याबाबत आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
1/7
Tea : चहामध्ये मीठ टाकून प्यायलं तर काय होईल?
कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. काही लोक तर असे आहेत ज्यांना दिवसभर कधीही चहा दिला तरी चहा पिण्याची त्यांची तयारी असते.
advertisement
2/7
सामान्यपणे चहा म्हणजे पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून बनवतो. चवीसाठी त्यात कुणी वेलची तर कुणी आलं, कुणी चहाचा मसाला टाकतं.
advertisement
3/7
पण काही लोक असे आहेत जे चहामध्ये मीठ टाकूनही पितात. चहात मीठ तुम्हाला वाचूनच विचित्र वाटलं असेल. काहींनी तर तोंडही वाकडं केलं असेल. पण आहार तज्ज्ञांनी चहात मीठ टाकून पिण्याचे फायदे सांगितले आहेत.
advertisement
4/7
मिठातील सोडियम शरीरातील पचन एन्झाइम सक्रिय करतं. ज्यामुळे अन्न नीट पचतं.  चहा प्यायल्याने गॅस होतो, अशी तक्रार कित्येकांची असते. चहात मीठ टाकून प्यायल्याने ही समस्यादेखील होत नाही.
advertisement
5/7
मिठातील मिनरल्स तणाव आणि चिंता कमी करण्यात मदक करतात. शरीर शांत ठेवतात आणि मानसिक थकवा दूर करतात.
advertisement
6/7
सर्दी-खोकला झाला असल्यास चहात मीठ टाकून प्यावं. मीठ घशातील संसर्ग कमी करण्यात मदत करतं. घशाची खवखव दूर होते. बंद नाक खुलं होतं.
advertisement
7/7
आता चहात मीठ टाकायचं म्हणजे नेमकं किती टाकायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एक कप चहासाठी जवळपास 1/8 चमचा मीठ पुरेसं आहे. जास्त मीठ झालं तर चहाची चव बिघडू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Salt Tea : चहामध्ये मीठ टाकून प्यायलं तर काय होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल